AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : 2000 साली दोघा मुलांचा बुडून मृत्यू! तेव्हा शिंदेंनी ठरवलं, राजकारण सोडूनच द्यायचं, पण…

Maharashtra politics Politics : 2014 आणि 2019 दोन्ही वेळेला त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं त्यांनी निर्विवाद सांभाळलं. पण याआधी त्यांच्यावर आनंद दिघे यांनी कठीण मोहिमा सोपवल्या होत्या.

Eknath Shinde : 2000 साली दोघा मुलांचा बुडून मृत्यू! तेव्हा शिंदेंनी ठरवलं, राजकारण सोडूनच द्यायचं, पण...
एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आठवणी...Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 01, 2022 | 10:09 AM
Share

मुंबई : गोष्ट 2000 सालची. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या दोन मुलांना गमावलं. दोघांचा बुडून मृत्यू झाला. गावात ही दुर्घटना घडली. आपल्या पोटच्या पोरांचा ऐन भरारीच्या वयातील मृत्यू पाहून कोणत्याही बापाचं काळी हेलावले. शिंदेच्या बाबतही तेच झालं. ते पूर्णपणे कोलमडले होते. त्यांचा धीर खचला होता. आता राजकारण नकोच, असा विचार जवळपास एकनाथ शिंदे यांनी पक्का केलाच होता. अचानक झालेला मुलांचा मृत्यू हा एकनाथ शिंदे यांच्या मनावर झालेला सगळ्यात मोठा आघात होता. राजकारण सोडायचं, या विचारात एकनाथ शिंदे होते. तेव्हा त्यांना त्यांच्या राजकीय गुरु समजल्या जाणाऱ्या आनंद दिघे (Aanand Dighe) यांनी धीर दिला. दिघेंनी आनंद शिंदे यांना सावरलं. त्यांनी पुन्हा सक्रिय केलं. राजकारणाची दिशा दाखवली. ठाणे पालिकेत त्यांना महत्त्वाचं पदही आणि प्रोत्साहितही केलं. ठाणे पालिकेत सभागृह नेते म्हणून दिघेंनी नियुक्ती झाल्यानंतर ठाण्यातील (Eknath Shinde in Thane) माहौलही बदलला.

ते दिवस…!

शिंदे यांच्या पालिका कार्यालयात लोकांची गर्दी जमू लागली. कार्यालयाबाहेर रांग लागू लागली. संध्याकाळी बंद होणारं कार्यालय आता रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवावं लागत होतं, इतका लोकांचा कामासाठी रिघ वाढला होता. नंतर नंतरच्या काळात आनंद दिघेंचे शागिर्द म्हणून ओळखले जाणारे शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेतही आले. शिंदेला विधानसभा निवडूक लढवण्याची संधी मिळाली. ते साल होतं 2004. मिळालेल्या संधीचं एकनाथ शिंदे यांनी सोनं करु दाखवलं. चार वेळी आमदार म्हणून निवडून येण्याची किमयाही त्यांनी केली.

महत्त्वाची कामं शिंदेकडे…

2014 आणि 2019 दोन्ही वेळेला त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं त्यांनी निर्विवाद सांभाळलं. पण याआधी त्यांच्यावर आनंद दिघे यांनी कठीण मोहिमा सोपवल्या होत्या. या सर्व मोहिमात एकनाथ शिंदे यांनी यशस्वी करुन दाखवल्या होत्या. दिघे साहेब मला नेहमी अवघड काम सोपवायचे आणि ते पूर्ण करणं हे मी एक आव्हान मानायचो. दिघेंच्या विश्वासानं मला खूप घडवलं आणि मदतही केली, असं एकनाथ शिंदे यांनी एकदा म्हटलं होतं.

गेल्या 10 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणाचे नाट्यमय घडामोडी अनुभवल्या. यापैकी सर्वोच्च नाट्यमय घडामोड होती, ती एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची. बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे 8 दिवस गुवाहाटीमध्ये होते. एक दिवस त्यांनी सूरतमध्ये घालवला. तर नवव्या दिवशी ते गोव्यात दाखल झाले होते. तिथून ते मुंबईत आले. त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्याच दिवशी (30 जून) त्यांनी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली.

21 जूनला या सर्व नाट्यमय घडामोडींची सुरुवात झालेली होती. या काळात एकनाथ शिंदे यांच्यावर रिक्षावाला म्हणून टोमणेही मारले गेले. त्यांना गद्दार म्हणूनही हिणवण्यात आलं. पण शेवटपर्यंत आपण कट्टर शिवसैनिक आहोत, असं ते म्हणत राहिले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात बंड केलं, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलीय.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.