AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’चं महत्त्व वाढलं, मुख्यमंत्र्यांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत कोण कोण आलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'चं महत्त्व वाढलं, मुख्यमंत्र्यांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत कोण कोण आलं?
Fadnavis and Thackeray
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 27, 2025 | 7:09 PM
Share

राज्यातील गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही कुटुंबास शिवतीर्थावर जात राज ठाकरेंच्या गणरायाचे दर्शन घेतले होते. त्यांतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या घरी हजेरी लावली होती. या सर्व नेत्यांच्या हजेरीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी घेतलं बाप्पाच दर्शन

आज दुपारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात गणरायाचे दर्शन घेतले होते. यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात 10 मिनिटे चर्चाही झाली होती. जुलैमध्ये वरळी येथील मराठीच्या मुद्यावर हे दोन्ही नेते जवळजवळ 20 वर्षांनी मंचावर एकत्र आले होते. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांची महापालिका निवडणुकीसाठी युती होणार असल्याचे बोलले जात आहे, मात्र याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही.

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली

वरळीतील कार्यक्रमानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली असल्याचे दिसत आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्री वर गेले होते. त्यावेळी दोघांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर एकत्र फोटो काढले होते. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही नेते एकत्र येण्याची अटकळ बांधली जात आहे.

देवेंद्र फडणवीसांचीही राज ठाकरेंच्या घरी भेट

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवतीर्थवर जात राज ठाकरे यांच्या घरी विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. तसेच संजय राऊत यांनीही शिवतीर्थावर जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आजच्या या भेटींमुळे राजकारणावर फारसा प्रभाव पडणार नसला तरी राज्यातील नेते हे राज्याची संस्कृती जपत असल्याचे समोर आले आहे. आता पुढील काही दिवसांमध्ये इतरही नेते राज ठाकरेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?