इकडे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता; हे तुमचं हिंदुत्व?: उद्धव ठाकरे

| Updated on: Oct 25, 2020 | 8:31 PM

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा करणाऱ्यांनी गोव्यात हा कायदा का केला नाही? असा सवाल करतानाच आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये. इकडे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता, असं आमचं हिंदुत्व नाही, असा घणाघाती हल्ला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजवर चढवला.

इकडे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता; हे तुमचं हिंदुत्व?: उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा करणाऱ्यांनी गोव्यात हा कायदा का केला नाही? असा सवाल करतानाच आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये. इकडे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता, असं आमचं हिंदुत्व नाही, असा घणाघाती हल्ला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजवर चढवला. (cm Uddhav Thackeray addresses Shiv Sena Dussehra rally at mumbai)

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला संबोधित करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आम्हाला कुणीही हिंदुत्व शिकवू नये. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तुमच्यासारखं सोयीचं हिंदुत्व आम्ही मिरवत नाही, असा टोलाही त्यांनी लागवला.

बाबरी मशीद पडली तेव्हा महाराष्ट्रात आगडोंब उसळल्यावर फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पुढे आली. त्यामुळे हा महाराष्ट्र वाचला. त्यावेळी आज हिंदुत्वाची शिकवण देणारे कुठे होते? कोणत्या बिळात हे लोक शेपूट घालून बसले होते, असा सवाल त्यांनी केला.

भागवतांनी सांगितलेलं हिंदुत्व समूजन घ्या

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात हिंदुत्वाचा अर्थ समजून सांगितला. भागवतांना मानणारे लोक असतील तर त्यांनी नुसती काळी टोपी घालू नये. त्या टोपीखाली डोकं असणाऱ्यांनी थोडा विचारही केला पाहिजे. हिंदुत्व समजून घेतलं पाहिजे. हिंदुत्वाबाबत काही लोक भ्रम पसरवित आहेत. हिंदुत्वाचा अर्थ पूजेशी जोडून संकुचित करत आहेत, असं भागवत म्हणाले. त्यामुळे भागवतांनी सांगितलेला हा अर्थ समजून घ्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला नाव न घेता लगावला.

मला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारले जात आहे. मंदिर उघडत नाही म्हणून मला हे प्रश्न विचारले जात आहेत. याद राखा, वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर फटका मारणारच. तुम्हाला जर फटका मारून घ्यायचाच असेल तर जरूर या, असं आव्हान देतानाच बाबरी पडली तेव्हा कुठल्या बिळात शेपट्या घालून पडले होते? ज्यांचं नाव कुणालाही माहीत नव्हतं ते लोक मला हिंदुत्वाबाबत विचारत आहे, असं सांगतानाच कोरोना आला की घंटा बडवा, थाळ्या वाजवा हेच तुमचं हिंदुत्व. इकडे गाय म्हणते माता आणि पलिकडे जाऊन खाता हेच का तुमचं हिंदुत्व?, असे टोलेही त्यांन लगावले. (cm Uddhav Thackeray addresses Shiv Sena Dussehra rally at mumbai)

संबंधित बातम्या:

CM Uddhav Thackeray UNCUT Speech | शिवसेना दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन : उद्धव ठाकरे

भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र- उद्धव ठाकरे

(cm Uddhav Thackeray addresses Shiv Sena Dussehra rally at mumbai)