उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात बैठक, रायगडच्या वादावर चर्चा, मात्र राज्यात एकत्र लढण्याच्या हालचाली

| Updated on: Jul 23, 2020 | 7:30 PM

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे (CM Uddhav Thackeray and Ajit Pawar meet on Raigad political issue).

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात बैठक, रायगडच्या वादावर चर्चा, मात्र राज्यात एकत्र लढण्याच्या हालचाली
Follow us on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील पुढील निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (CM Uddhav Thackeray and Ajit Pawar meet on Raigad political issue).

कोकणातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरुन मतभेद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (23 जुलै) बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे बैठक बोलावली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह कोकणातील शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. (CM Uddhav Thackeray and Ajit Pawar meet on Raigad political issue).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या बैठकीत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं आहे. तसेच पुढील निवडणुकाही एकत्र लढवायच्या आहेत, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी राज्यातील पुढील निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला तर भाजपला नुकसान होईल का? या प्रश्नाचं उत्तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिलं.

“तीनही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. खरं म्हणजे आमचे 105 आमदार निवडून आले आहेत. आमच्या पाठीमागे जनतेचा एवढा मोठा पाठिंबा आहे. त्यावेळी आमच्यासोबत शिवसेना होती. पण त्यांनी आमची साथ सोडली. पण, आता जनताच ठरवेल. आता जनताच सोक्षमोक्ष लावेल”, असं गिरीश महाजन म्हणाले.

“आम्ही सक्षम आहोत. आम्हाला कुणाची गरज नाही. आता जनताच ठरवेल. आता तर फक्त सहा महिने झाले आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय जरी घेतला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

“खरंतर सध्या कोणतीही निवडणूक नाही. सध्या सरकार अपयशी ठरलं आहे. शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली आहे. कापूस, मका, हरभरा सरकारने घेतला नाही. त्यामुळे मतदारच ठरवतील”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

संबंधित बातमी :

रायगडचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराज, शिवसेनेचे तिन्ही आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला