AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही,मग महाराष्ट्रातच का? मुख्यमंत्र्यांचा सवाल

मराठा बांधवांनो, तुमच्या आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत. विनाकारण उद्रेक कशासाठी करता? आपण एकत्र आहोत" असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही,मग महाराष्ट्रातच का? मुख्यमंत्र्यांचा सवाल
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 13, 2020 | 2:08 PM
Share

मुंबई : मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार सुप्रीम कोर्टात कमी पडलेले नाही. राज्य सरकार मराठा बांधवांच्या सोबतच आहे, अशी हमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही, मग महाराष्ट्रातच का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना कोरोना, शेती, मराठा आरक्षण, राजकारण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. (CM Uddhav Thackeray on Maratha Reservation)

“मराठा आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेत होते, तर काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात होते. मात्र विधीमंडळातील सर्व पक्षांनी मराठा आरक्षणासाठी बहुमताने नाही, तर एकमताने निर्णय घेतला. त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले, ते आव्हान आपण जिंकलो, सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहेत. पण पहिल्या सरकारचे वकील आपण बदललेले नाहीत, उलट नवे वकीलही नियुक्त केले, ज्या-ज्या सूचना मिळत गेल्या त्यांचे पालन केले. राज्य सरकार म्हणून आपण कोर्टात कमी पडलो नाही” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

“मोठ्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मानली, पण ते करताना अनाकलनीय पद्धतीने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली. इतर राज्यात तशी दिल्याचे माझ्या माहितीत नाही, पण गरज नव्हती ती स्थगिती दिली.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“आता कोणासमोर काय आणि कशा पद्धतीने गाऱ्हाणं मांडायचे याचा आम्ही अभ्यास करत आहोत, विरोधीपक्ष नेत्यांशी मी फोनवर बोललो, ते सध्या बिहारला आहेत, पण त्यांनीही आपण सोबत असल्याची हमी दिली. इथे राजकारण हा मुद्दा नाही. त्यामुळे मराठा बांधवांनो, तुमच्या आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत. आंदोलन जरुर करा, पण केव्हा? सरकार दाद देत नसेल तर आंदोलन करा, विनाकारण उद्रेक कशासाठी करता? आपण एकत्र आहोत” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

“अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील असे मंत्रीमंडळातील अनेक मंत्री त्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या संकटात आंदोलन करु नका, तुम्हाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गैरसमज पसरवू नका, एकजुटीने न्याय मिळवून देऊ” अशी हमी उद्धव ठाकरे यांनी मराठा बांधवांना दिली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

  • सर्वधर्मीयांनी आपापले सण-उत्सव साजरे करताना संयम पाळला, त्याबद्दल आभार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू उपस्थिती वाढवत आहोत, पण कोरोना, पावसाळा आणि सण उत्सव एकत्र, कोरोनाचे संकट वाढत आहे, जगात दुसरी लाट येण्याची शक्यता, मुंबईसह ग्रामीण भागातही कोरोना पसरतोय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • कोरोना गेला म्हणजे पुन्हा राजकारण सुरु करण्याचे प्रयत्न, महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला काढून नक्की बोलणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • WHO ने पुढच्या भीषण संकटाची नांदी असल्याचे सांगितले आहे, येत्या 15 तारखेपासून एक महिनाभर नवी मोहीम, माझे कुटुंब माझी जबाबदारी, जात-पात-धर्म विसरुन महाराष्ट्रावर प्रेम करणारे सर्व यात सहभागी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनावर लस येईल अशी अपेक्षा, आवश्यकता नसेल तर घराबाहेर जाऊ नका, मास्क काढून गर्दीत फिरु नका, अंतर ठेवा, हात सतत धुवा, हीच विषाणूपासून लांब राहण्याची त्रिसूत्री : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray on Maratha Reservation)
  • राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि व्याधीची माहिती घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • ऑनलाईन खरेदीवर भर द्या, सार्वजनिक वाहतुकीत बोलू नका, कोणाकोणाला भेटलात याची यादी बनवत राहा, एकत्र जेवताना समोरासमोर बसू नका, जिम-रेस्टॉरंट मालकांनी सूचना पाळाव्या, आपण सुरु करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • बंद जागेत भेटणे टाळा, एसीचा वापर कमी करा, पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • जवळपास 29 लाख 50 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले, विक्रमी कापूस खरेदी, पुढील वर्षभर साडेसहा लाख कुपोषित, आदिवासी बालकांना मोफत दूधदुभते, तर गर्भवती आणि स्तनदा मातांनाही लाभ, पावणेदोन कोटी शिवथाळीचे वितरण : मुख्यमंत्री
  • 3 लाख 60 हजार सर्व प्रकारचे बेड्स (आयसीयू, ऑक्सिजन आणि सामान्य) गेल्या 4 ते 5 महिन्यात वाढवले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • शेतकरी वर्क फ्रॉम होम करु शकत नाहीत, जे विकेल तेच पिकेल, कोणत्या पिकाला कुठे बाजारपेठ आहे, याचा अभ्यास कृषी मंत्रालय करुन शेतकऱ्यांना बियाणे देऊ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • विधीमंडळातील सर्व पक्षांनी मराठा आरक्षणासाठी एकमताने निर्णय घेतला, उच्च न्यायालयात आव्हान जिंकलो, पहिल्या सरकारचे वकील बदलले नाहीत, नवे वकीलही नियुक्त, कोर्टात कमी पडलो नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • मोठ्या खंडपीठासमोर मराठा आरक्षण मुद्दा मांडण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मानली, पण अनाकलनीय पद्धतीने अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली, इतर राज्यात दिली नाही, पण गरज नव्हती ती स्थगिती दिली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • काय, कोणासमोर गाऱ्हाणं मांडायचे हे विचारत आहोत, विरोधीपक्ष नेत्यांशी बोललो, त्यांच्याकडून सोबत असल्याची हमी, मराठा बांधवांनो, तुमच्या भावना वेगळ्या नाहीत, सरकार दाद देत नसेल तर आंदोलन करा, कशासाठी उद्रेक करता? आपण एकत्र आहोत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • कोरोनाच्या संकटात आंदोलन करू नका, तुम्हाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध, गैरसमज पसरवू नका, एकजुटीने न्याय मिळवून देऊ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

‘जे विकेल तेच पिकेल’, कृषी मंत्रालय अभ्यास करुन शेतकऱ्यांना बियाणे देणार : मुख्यमंत्री

(CM Uddhav Thackeray on Maratha Reservation)

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...