चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय : उद्धव ठाकरे

| Updated on: Sep 17, 2021 | 12:48 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा खरोखर वादळी ठरला. मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या, विरोध करणाऱ्या एमआयएमला उत्तर दिलं, तर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला.

चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय : उद्धव ठाकरे
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे.
Follow us on

औरंगाबादमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा खरोखर वादळी ठरला. मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या, विरोध करणाऱ्या एमआयएमला उत्तर दिलं, तर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला. मला कळलंय की चंद्रकांत पाटील तिन्ही पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करतायत, असं ते म्हणाले.

मला माजी मंत्री म्हणू नका. पुढच्या दोन-तीन दिवसांत बघा काय होतंय, असं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे कालपासून अर्थ अन्वयार्थ लावले जात होते. शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चाही होत होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मिश्किल उत्तर दिलं.

चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार, मुख्यमंत्र्याचा टोला

चंद्रकांत पाटील यांनी काल मला माजी मंत्री म्हणू नका, असं म्हटलं. माझ्या कानावर असं आलंय की चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत, असं म्हणताना मुख्यमंत्रीही हसले. उपस्थित पत्रकारांनाही मुख्यमंत्र्यांनी हसायला भाग पाडलं.

चंद्रकांतदादा नागालँडचे राज्यपाल होणार, राऊतांनी डिवचलं

चंद्रकांतदादांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही डिवचलं. माझ्या कानावर असं आलंय की चंद्रकांतदादा नागालँडचे राज्यपाल होणार आहेत.. दादांच्या वक्तव्यानंतर मी त्यांना फोन सांगितलं की पुढचे 25 ते 30 वर्ष तुम्ही आणखी ‘माजी’च राहणार आहेत, असंही राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

पिंपरी चिंचवड जवळील देहूगावमधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. सूत्रसंचालकाने दोन-तीनवेळा चंद्रकांत पाटील यांना माजी मंत्री असं संबोधलं. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मागे वळून, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत दिले होते.

(Cm Uddhav Thackeray Taunt Chandrakant Patil on His Statement)

हे ही वाचा :

मॅनेजर म्हणाला, दानवेंना बोलवा, रावसाहेब म्हणाले, ‘अहो मीच तो’, 65 रुपयांच्या चेकच्या किस्स्याने मुख्यमंत्रीही खळखळून हसले!

दानवे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, उद्धव म्हणाले, शब्द दिला!

आमचे भावी सहकारी ते रेल्वे रुळ सोडून आमच्या स्टेशनवर येऊ शकता, उद्धव ठाकरेंची भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर!