
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसत होतं. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

काँग्रेस पक्षाला आघाडी मिळताना दिसल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. काँग्रेसच्या बाजूने घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

पण नंतर नंतर परिस्थिती बदलायला लागली. तिसऱ्या कलानंतर भाजपची आघाडी पाहायला मिळाली. ती आघाडी अद्याप कायम आहे.

भाजप पक्षाचे उमेदवार आघाडीवर आल्याने भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सध्या निकालाचा कल पाहिला तर भाजप आघाडीवर दिसत आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये भाजपची आघाडी पाहायला मिळतेय. तर केवळ तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळताना दिसत आहे.