Nana Patole : जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी राज ठाकरेंचे दौरे, नाना पटोलेंची केंद्रासह मनसेवरती टीका

राज्यसभेची निवडणूक काँग्रेसच्या आमदारांचे प्रश्न याबाबत कॉंग्रेसची एक बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीला बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती असणार आहे.

Nana Patole : जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी राज ठाकरेंचे दौरे, नाना पटोलेंची केंद्रासह मनसेवरती टीका
पेट्रोल डिझेल दरात कपातीचे केंद्रसरकारकडून नाटकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 2:03 PM

मुंबई – देशात रोज महागाई वाढत आहे. मुख्य जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) दौरे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच त्यानंतर ते रद्द देखील करतात. आम्हाला धर्माच्या गोष्टी दुसऱ्यांकडून शिकायच्या नाहीत. देशात दररोज रुपया खाली पडत आहे, त्यामुळे मनसेला (MNS) म्हणणं आहे की धार्मिक विषय सोडावा. संभाजी महाराज यांचा आम्ही आदर करतो, आमच्यासोबत त्याची कोणतीही बोलणी झालेली नाही. संभाजी राजे यांच्या नावाला विरोध नाही, आमच्याकडे देखील जास्तीची मते आहेत असं नाना पटोलेंनी (Nana Patole) मीडियाला सांगितलं. आज राज ठाकरेंचा आयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर नाना पटोलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच धार्मिक विषय सोडावा अशी विनंती सुध्दा त्यांनी केली आहे.

कॉंग्रेसची आज महत्त्वाची बैठक

राज्यसभेची निवडणूक काँग्रेसच्या आमदारांचे प्रश्न याबाबत कॉंग्रेसची एक बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीला बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे .विशेष म्हणजे शरद पवार यांनी माझी तक्रार सोनिया गांधी यांच्याकडे केली तर आनंद आहे असं नाना पटोले म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

जीएसटीच्या माध्यमातून कंट्रोल आपल्या हातात आहे

अयोध्या पाकिस्तानात नाही भारतातच आहे. धर्माचा फायदा सत्तेसाठी करण्यात येत आहे. अयोध्येला जाणं म्हणजे पाकिस्तानला जाणं नाही. अयोध्या आमचं श्रद्धास्थान आहे. तसेच राज्याचं महागाईवर कंट्रोल आहे. जीएसटीच्या माध्यमातून कंट्रोल आपल्या हातात घेतला आहे. कोणताही टॅक्स लावण्यात आलेला नाही. लाखो कोटी रुपये आमचे केंद्राकडे प्रलंबित आहेत. आमच्या हक्काचे पैसे लवकरात लवकर द्यावे.

तसेच आम्हाला अर्थिक अडचणीत आणून महाराष्ट्र आणि मुंबईला बरबाद करण्याचा डाव आहे असाही टोला नाना पटोले यांनी केंद्राला लगावला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.