Maharashtra Politics: ‘राहुल गांधींचे फोन टॅप..’ महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक; भाजपला थेट इशारा!

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माझाही फोन टॅप केला होता, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. रश्मी शुक्ला यांनी माझा फोन टॅप केला होता, असं नाना पटोले म्हणाले.

Maharashtra Politics: राहुल गांधींचे फोन टॅप.. महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक; भाजपला थेट इशारा!
Image Credit source: Twitter| Rahul Gandhi
| Updated on: Nov 13, 2026 | 3:06 PM

Nana Patole News:  ‘केंद्र सरकारकडून माझा फोन टॅप केला जात आहे, असा सर्वात मोठा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. माझ्या सर्व आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत,’ जो केंद्र सरकार टॅप करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या दाव्यानंतर आता काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणालेत नाना पटोले? 

Loading...

“राहुल गांधींनी केलेले फोन टॅपिंगचे आरोप खोटे नसून ती वस्तुस्थिती आहे. कारण ते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माझाही फोन टॅप केला होता, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. रश्मी शुक्ला यांनी माझा फोन टॅप केला होता, असं नाना पटोले म्हणाले.

तसेच “त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्रात पाठवण्यात आले आणि भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणून डीजी पदावर दोन वर्षांचे मुदतवाढ देऊन बक्षीस देण्यात आले. अशा पद्धतीचे अधिकारी पोसून ठेवून विरोधकांचे फोन टॅप करायचे आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचे, असे खालच्या दर्जाचे राजकारण भारतीय जनता पार्टी करत आहे,” असा घणाघात नाना पटोले यांनी यावेळी केला.

..तर तीव्र जनआंदोलन उभारणार, नाना पटोलेंचा इशारा! 

तसेच “मतांची आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर चोरी करणाऱ्या आणि विरोधी पक्षनेत्याचा फोन टॅप करणाऱ्या या कृत्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे येऊन उत्तर द्यावे आणि देशाची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. जर या गोष्टीत सुधारणा झाली नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारून नरेंद्र मोदींच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावेळी दिला.

पृथ्वीराज चव्हाण यांचेही गंभीर आरोप 

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही फोन टॅपिंगच्या आरोपांवरुन भाजपवर निशाणा साधला. “यापूर्वीही इस्रायली पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून प्रमुख विरोधी नेत्यांचे फोन टॅप केल्याची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून समोर आली होती. तंत्रज्ञानाचा वापर करून फोन टॅप करणे शक्य आहे, परंतु अशा कृतींना सर्वोच्च पातळीवरून परवानगी असल्याशिवाय ते शक्य होत नाही. गृहमंत्री किंवा पंतप्रधानांच्या परवानगीशिवाय मोठ्या राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे शक्य नाही,” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us