AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तटकरेंविरोधात रायगडमध्ये काँग्रेसचा उमेदवार तयार?

रायगड : लोकसभा निवडणुका काही दिवासांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे उमेदावर ठरण्याआधीच सर्वच पक्षांनी आपापल्या परीने मतदारसंघांमध्ये प्रचाराला सुरुवातही केली आहे. अशातच राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झाली असतानाही, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रायगडधून आव्हान देण्यासाठी काँग्रेसचे पंकज तांबे सज्ज झाले आहेत. पंकज तांबे हे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते […]

तटकरेंविरोधात रायगडमध्ये काँग्रेसचा उमेदवार तयार?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

रायगड : लोकसभा निवडणुका काही दिवासांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे उमेदावर ठरण्याआधीच सर्वच पक्षांनी आपापल्या परीने मतदारसंघांमध्ये प्रचाराला सुरुवातही केली आहे. अशातच राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झाली असतानाही, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रायगडधून आव्हान देण्यासाठी काँग्रेसचे पंकज तांबे सज्ज झाले आहेत.

पंकज तांबे हे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. याच पंकज तांबे यांनी थेट सुनील तटकरे यांच्याच विरोधात लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसचे इच्छुक उमेदवार पंकज तांबे

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, तर सेना-भाजपा युती हे समीकरण जुळलेलच असते. ग्रामपंचायतींसह पचांयत समिती, जिल्हा परिषद ते नगरपचांयत, नगरपालिका स्थानिक स्वराज्य सस्थेंसाठी राष्ट्रवादी आणि शेकापने आघाडी केली आहे. यात सुनील तटकरे यांनी काँग्रेसला सोबत घेतल्याचे केवळ चित्र निर्माण केले. मात्र, कुठलेही पद किंवा महत्त्वाचा विभाग त्यांनी दिला नाही, असा आरोप काँग्रेसकडून कायम केला जातो.

रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?

तसेच, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. त्यामुळे काँग्रेसला उमेदवारासाठी अचानक धावाधाव करावी लागली होती. त्यामुळे पुढे अशावेळी काँग्रेस कमी पडू नये म्हणून रायगड जिल्ह्याती माणगावमधील काँग्रेसचे स्थानिक नेते पंकज ताबे यांनी वरिष्ठांना कळवून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, असे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाटाघाटीमध्ये रायगडची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, रायगड हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. बॅ. अतुंले यांनी या जिल्ह्यासह कोकणात अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी आपण उमेदवारी मागितली असून, पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण लढण्यास तयार आहोत, असे काँग्रेसचे स्थानिक नेते पंकज तांबे यांच्या माणगाव येथी निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीनतंरच्या पत्रकार परिषदेमध्ये पंकज तांबे यांनी माहीती दिली.

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी