रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?

रायगड : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होत आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा टीव्ही 9 मराठी घेत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला खेटून असलेला मतदारसंघ म्हणजे रायगड. चाणाक्ष मतदार, कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदार संघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. एकेकाळी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) चा गड म्हणून रायगड मतदारसंघाची ओळख […]

रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?
रायगडमधील शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद मिटवण्यासाठी दोन्ही खासदार सरसावले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

रायगड : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होत आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा टीव्ही 9 मराठी घेत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला खेटून असलेला मतदारसंघ म्हणजे रायगड. चाणाक्ष मतदार, कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदार संघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. एकेकाळी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) चा गड म्हणून रायगड मतदारसंघाची ओळख होती. शेकाप आणि काँग्रेसचा उमेदवार आलटून-पालटून निवडणून देणारा हा मतदारसंघ. मात्र हे गणित मोडित काढत 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार अनंत गिते या मतदारसंघातून निवडून आले.

आता 2019 च्या रायगड लोकसभा निवडणुकीत वेगळे राजकीय फासे फेकले जाणार असल्याने ही निवडणूक महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय लढत म्हणून याकडे पाहिलं जाणार आहे. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत या मतदारसंघात असली तरी शेकाप आणि काँग्रेसची भूमिका निकालावर निर्णायक शिक्कामोर्तब करणार आहे. तर कुणबी मतदार जास्त असलेल्या या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा गितेचा कुणबी फॅक्टर काय काम करतो यावर निकालाची गणिते अवलंबून असणार आहेत.

कधीही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ

48 क्रमाकांचा रायगड लोकसभा मतदारसंघ. रायगड लोकसभा मतदारसंघाला फार मोठा राजकीय इतिहास आहे. नव्याने पुनर्रचना होण्याआधी कुलाबा लोकसभा मतदार संघ म्हणून याची ओळख होती. 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काँग्रेसने मोठं यश मिळवलं. पण कुलाबा मतदारसंघ त्यावेळी शेकाप पक्षासोबत राहिला. अगदी गेल्या 2014 च्या निवडणुकीत देशात मोदी लाट असतानाही शिवसेनेचे अनंत गिते जेमतेम 2 हजार 110 मतांनी विजयी झाले. 1989 ते 1996 पर्यंत सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी शेकापचे अॅड. दत्ता पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर दोनवेळा शेकापचे रामशेठ ठाकूर निवडून आले. 2004 च्या निवडणुकीत अंतुले पुन्हा विजयी झाले. रायगड मतदार संघाचा इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ कधीच लाटेवर स्वार झाला नाही.

2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल

रायगड लोकसभा मतदारसंघात चार रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ, रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघ येतात. रायगडमधील पेण, अलिबाग श्रीवर्धन आणि महाड, तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघ येतात. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या अनंत गिते यांना 4 लाख 13 हजार 546 मते, तर बॅरिस्टर ए. आर अंतुले यांना 2 लाख 67 हजार 25 मते मिळाली होती. प्रविण ठाकूर या अपक्ष उमेदवारांना 39 हजार मते मिळाली. 2009 मध्ये अनंत गिते मोठ्या फरकाने निवडून आले होते.

2014 ला मोदी लाट होती. तरीही अवघ्या दोन हजार मतांनी अनंत गिते निवडून आले. शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या अनंत गिते यांना 3 लाख 96 हजार 178, राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना 3 लाख 94 हजार 68, तर शेकापकडून उमेदवारी मिळालेल्या रमेश कदमांना 1 लाख 29 हजार मतं मिळाली  होती. गिते यांना एकूण मतदानापैकी 40.11 टक्के मतं, तर तटकरे यांना 39.89 टक्के मतदान झालं होतं.

अलिबाग मतदारसंघातून मधुकर ठाकूर यांनी, तर पेण मतदारसंघातून रविशेठ पाटील यांनी तटकरे यांना मताधिक्य मिळवून दिलं. गेल्या निवडणुकीत रायगडमध्ये शिवसेना भाजप युती, शेकाप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. गेल्या वेळी शेकापच्या वतीने निवडणूक लढवणारे रमेश कदम आता काँग्रेसमध्ये आलेत. याआधी एकमेकांना पाण्यात पाहणारे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील हे एकत्र आलेत. रायगड लोकसभा मतदारसंघात कागदावर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. रायगड जिल्हा परिषदेची सत्ता आहे. महाड विधानसभा मतदारसंघात भरत गोगावले हे एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे तीन, तर शेकापचे दोन आमदार आहेत. तर अंतुले यांच्यानंतर काँग्रेसला इथे तारणहार सापडलेला नाही.

सुनील तटकरेंची नवी खेळी?

रायगड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मतदारसंघात काँग्रेसची दीड ते दोन लाख मते आहेत. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर. ए. आर. अंतुले यांनी रायगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे ही जागा काँग्रेस पक्षानेच लढवावी असा काँग्रेसचाही आग्रह आहे. काँग्रेसकडून माजी आमदार मधुकर ठाकूर आणि अंतुले यांची कंन्या यांचे नावं चर्चेत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली तरी रायगड लोकसभा मतदारसंघात चित्र वेगळं असण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मतभेदामुळे इथली लढत रंगतदार होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या घरातच तीन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कागदावर मजबूत वाटत असली तरी तटकरेंच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळून त्यांचे अनेक जवळचे सहकारी पक्ष सोडून शिवसेनेत सामील झालेत. खुद्द तटकरे यांनाही भाऊबंदकीने ग्रासलंय. मात्र 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दोन नावे चर्चेत आहेत. सुनील तटकरे किंवा भास्कर जाधव. माजी आमदार मधुकर ठाकूर आणि माजी मंत्री रवीशेठ पाटील तटकरेंच्या राजकारणाचे बळी ठरलेत. त्यामळे सुनील तटकरे निवडणुकीसाठी उभे राहिले तर काँग्रेस उघड बंडखोरी करेल अशी परिस्थिती रायगडात आहे.

तटकरे यांच्यावर जलसंपदा मंत्री असताना भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. पण तटकरे यांच्या गोटात त्यांचे कट्टर शत्रू असलेला शेकाप आता त्यांचा मित्र झालाय. तर रायगड लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून तटकरे यांनी भास्कर जाधवांचे नाव पुढे करत वेगळी राजकीय खेळी केली. भास्कर जाधव यांचे नाव तटकरे यांनी पुढे करून विरोधकांना गाफिल ठेवण्याची खेळी खेळली असावी असा राजकीय विश्लेषकांचा कयास आहे. भास्कर जाधव यांना उमेदवारी मिळाली तर तटकरे जाधव यांचे काम करतील का असा प्रश्न उपस्थित राहतो. पण राजकारणातील मुरब्बी रणनीतीमुळे तटकरे निवडणूक रिंगणात आले तर शिवसेनेला ही निवडणूक सहज राहणार नाही.

शिवसेनेकडून पुन्हा अनंत गिते?

शिवसेनेकडून यावेळेलाही अनंत गिते यांच्या पारड्यात उमेदवारीची माळ टाकली जाण्याची शक्यता आहे. सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले अनंत गिते केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपद सांभाळतात. त्यांची प्रतिमा चांगली असली तरी मंत्री म्हणून ते फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. नियमित बैठका आणि खासदार निधी संपवण्यापलीकडे त्यांचं काहीच काम दिसत नाही. त्यामुळे शिवसैनिकही त्यांच्यावर नाराज आहेत. या मतदारसंघात कुणबी मतांचं प्राबल्य आहे. स्वतः गिते कुणबी समाजाचे असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातील कुणबी मते या मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावणार आहेत. रायगड मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार असं चित्र आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्या भरीव असला तरी रायगडच्या समस्या आजही कायम आहेत. सात वर्ष मुंबई-गोवा महामार्गाच्या  चौपदरीकरणातील पहिल्या टप्यातील काम रखडलंय. इथला तरूण जमिनी विकून नोकरीसाठी मुंबईत पळतोय. सागरी महामार्गाचा अद्याप पत्ताच नाही. आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न रेंगाळलाय. अवजड उद्योग मंत्रीपद असून रायगडात एकही उद्योग नाही. आलेल्या उद्योगामुळे प्रदूषणाची मोठी समस्या भेडसावत आहे. त्यामुळे यावेळी राजकीय प्रतिष्ठेमुळे इथली निवडणूक रंगतदार अधिक ठरणार आहे. तर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघातून कदाचित बॅरिस्टर अंतुले यांच्या मुलीचं नावही उमेदवारीसाठी चर्चेत आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील ठळक मुद्दे

कुणबी मतदार जास्त असलेला लोकसभा मतदारसंघ.

शिवसेनेकडून खासदार अनंत गिते यांना पुन्हा उमेदवारीची शक्यता

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या बॅरिस्टर अंतुले यांचा मतदारसंघ

रायगड लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदार संघ येतात.

2009 ची लोकसभा निवडणूक

2009 मध्ये अनंत गिते- 4 लाख 13 हजार 546 मते

अब्दुल रहमान अंतुले 2 लाख 67 हजार 25 मते

प्रविण ठाकूर अपक्ष 39 हजार मते

2014 ची लोकसभा निवडणूक

अनंत गिते 3 लाख 96 हजार 178 मते

सुनील तटकरे 3 लाख 94 हजार 68 मते

रमेश कदम 1 लाख 29 हजार 730 मते

2014 च्या निवडणुकीत देशात मोदी लाट असतानाही शिवसेनेचे अनंत गिते जेमतेम 2 हजार 110 मतांनी विजयी झाले होते.

संबंधित बातम्या :

हिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर
नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?
उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?
माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.