AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, मरण पत्करेन पण माफी मागणार नाही : राहुल गांधी

मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi crticized on BJP) यांनी घेतला आहे.

मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, मरण पत्करेन पण माफी मागणार नाही : राहुल गांधी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Dec 14, 2019 | 2:08 PM
Share

नवी दिल्ली : मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi crticized on BJP) यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया झाल्याचे दिसत आहे, असं म्हटले होते. या वक्तव्याचा भाजपकडून विरोध करण्यात आला तसेच राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली होती. यावर भाजपला प्रत्युत्तर देताना राहुल गांधींनी (Rahul Gandhi crticized on BJP) निशाणा साधला.

“मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. मी सत्य बोललो मग माफी का मागू, मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागावी”, असं राहुल गांधी यांनी सांगितले.

“काही दिवसांपूर्वी 15-20 लोकांचे एक लाख 40 हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. श्रीमंत लोकांचे कर्ज माफ केले. पण आम्ही राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. कारण आम्हाला माहित आहे शेतकऱ्यांशिवाय अर्थव्यवस्था पुढे जाणार नाही. तसेच कमगारांशिवाय देश पुढे जाणार नाही. पण मोदींनी तुमचा सर्व पैसे खेचून श्रीमंत लोकांना दिला”, असा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला.

“तुम्ही देशाला मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींना निवडून दिले. देशाची प्रगती करण्यासाठी, जीडीपी वाढवण्यासाठी, पण त्यांनी काय केले”, असा प्रश्नही राहुल गांधीनी उपस्थितांना विचारला.

“जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात जाऊन पाहा नरेंद्र मोदींनी काय काम केलं. त्यांनी आग लावली. समाजात विभाजनाचे काम त्यांनी केले. तसेच देशाला कमजोर करण्याचे काम मोदींनी केले. पण सर्वांनी एकत्र येऊन देशाला वाचवूया. देशाला कमजोर करण्यापासून वाचवूया. मोदी दररोज टीव्हीवर दिसतात. टीव्हीवर दिसण्यासाठी खूप पैसा खर्च करतात. हा पैसा येतो कुठून”, असाही राहुल गांधी म्हणाले.

गांधी म्हणाले, “गेल्या पाच वर्षात मोदींनी उद्योजक अदानी यांना 50 कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. एक लाख कोटींपेक्षाही अधिक कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहेत. याला आपण चोरी आणि भ्रष्टाचार नाही बोलणार तर काय बोलणार.”

दरम्यान, आज (14 डिसेंबर) काँग्रेस पक्षातर्फे नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भारत बचाओ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. त्यासोबतच कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधीहीसह इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...