सलमान खान मध्य प्रदेशातून लोकसभेच्या रिंगणात?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

इंदौर : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ताकदवान उमेदवार शोधत आहेत. कुणी त्या त्या मतदारसंघातील ताकदवान नेता, तर कुणी थेट सेलिब्रिटींना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करिना कपूर हिला भोपाळमधून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची शिफारस स्थानिक काँग्रेस नेत्याने केल्यानंतर, […]

सलमान खान मध्य प्रदेशातून लोकसभेच्या रिंगणात?
Follow us on

इंदौर : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ताकदवान उमेदवार शोधत आहेत. कुणी त्या त्या मतदारसंघातील ताकदवान नेता, तर कुणी थेट सेलिब्रिटींना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करिना कपूर हिला भोपाळमधून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची शिफारस स्थानिक काँग्रेस नेत्याने केल्यानंतर, आता मध्य प्रदेशातूनच अभिनेता सलमान खान याला काँग्रेसकडून उमेदवारीची शिफारस केली जाते आहे.

मध्य प्रदेशमधील इंदौरमतून अभिनेता सलमान खान याला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा विचार काँग्रेसकडून केला जातो आहे. मध्य प्रदेशचे काँग्रेस सचिव राकेश यादव यांनी अभिनेता सलमान खान याने इंदौरमधून लढावं, यासाठी विनंती केल्याचे सांगितले.

सलमान आणि इंदौरचं नातं

अभिनेता सलमान खान याचे वडील म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ संवादलेखक सलीम खान हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदौरमधीलच आहेत. मात्र, तरुण वयात नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत ले आणि मुंबईतच स्थायिक झाले. त्यांच्या लेखनाने अनेक मोठ्या अभिनेत्यांना घडवलं, अनेक अजरामर सिनेमे त्यांच्या लेखनीतून साकारले आहेत. एकंदरीत सलमान खान याचं मध्य प्रदेशातील इंदौरशी नातं आहे. त्यामुळे त्या अनुषंघाने सलमान खानला इंदौरमधून लोकसभेसाठी उतरवण्याची इच्छा काँग्रेसच्या प्रदेश सचिवाने व्यक्त केली आहे.

सलमानची लोकप्रियता अफाट

सलमान खानची लोकप्रियता अफाट आहे. हिंदी सिनेसृष्टीत आजच्या घडीला सलमान खान सर्वात आघाडीचा अभिनेता आहे. लाको-करोडोंच्या संख्येत सलमान खानचे चाहते देशासह परदेशातही आहेत. अर्थात, मध्य प्रदेश याला अपवाद नाही. त्यामुळे सलमान खानला लोकसभेसाठी मध्य प्रदेशातून उतरवल्यास त्याचा फायदा पक्षाला इतर जागांवरही होऊ शकतो, असे काँग्रेसमधील काहींचे म्हणणे आहे.

अर्थात, सलमान खान निवडणूक लढणार का, याबाबत सलमान खानच्या वतीने काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे आतापर्यंत तरी सलमानच्या निवडणुकीसंदर्भातील चर्चा मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या गोटातच सुरु आहेत. त्यामुळे या वृत्तावर सलमान खानकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याआधी अभिनेत्री करिना कपूर हिच्या नावाची शिफारसही मध्य प्रदेशातील स्थानिक नेत्याने भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी केली होती. त्यावर पुढे कुठल्याही काँग्रेस नेत्याकडून कोणतेच स्पष्टीकरण आले नाही किंवा स्वत: अभिनेत्री करिना कपूर हिच्याकडूनही काही प्रतिक्रिया आली नाही.

संबंधित बातम्या :

करिना कपूर काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार?

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा, करिना म्हणते…