Cm Uddhav Thackeray : सोनिया गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाल्या काँग्रेस तुमच्या पाठिशी

| Updated on: Jun 25, 2022 | 10:52 PM

शिंदे गटाकडून हा सत्तेचा सारीपाट टाकण्यात आला आहे. ज्यामुळे राज्यातील सत्तेची समिकरणे बदलताना दिसत आहेत.

Cm Uddhav Thackeray : सोनिया गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाल्या काँग्रेस तुमच्या पाठिशी
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीत सरकार (Mahavikas Aghadi Sarkar) सध्या बिघाड झाला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेत बंड पुकारले आहे. तर या बंडात शिवसेनेसह अपक्ष आमदारांनी सहभाग घेतला आहे. ज्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर संकट आले आहे. त्यादरम्यान राज्यातील सेनेचे अनेक नेते गेले असले तरीही सामान्य शिवसैनिक हे ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखिल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या पाठिशा ठाम असल्याचे म्हटलं आहे. याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Congress National President Sonia Gandhi) यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क केला. तर या संकटाच्या वेळी काँग्रेस तुमच्या पाठिशी असल्याचे म्हटलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या खळबळ माजली असून शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे हादरे बसत आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करत शिवसेनेतून फारकत घेतली आहे. तर आपल्या सोबत नाराज आमदारांची फौज घेत आधी सूरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठली आहे. तेथूनच आपले प्रस्ताव आणि मागण्या उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्या जात आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे कसे शिवसेनेचे नुसकान होत आहे यावर बोलले जात आहे. यादरम्यान काँग्रेसच्या नेत्या आणि अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे. तसेच त्यांनी बोलताना, काँग्रेस पार्टी ही या कठीण समयी शिवसेनेसोबत असल्याचे म्हटलं आहे. तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीचाही त्यांनी आढावा घेतला.

हे सुद्धा वाचा

तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नँशनल हेरॉल्डप्रकरणी चौकशी करण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. तर राहुल गांधी यांची ईडीने नँशनल हेरॉल्डप्रकरणी चौकशी केली आहे. यादरम्यान राज्यात शिंदे गटाकडून हा सत्तेचा सारीपाट टाकण्यात आला आहे. ज्यामुळे राज्यातील सत्तेची समिकरणे बदलताना दिसत आहेत. अशावेळी सोनिया गांधी यांनी फोन करून आपण शिवसेना तर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत असल्याचे म्हटलं आहे.