विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं जागावाटप!

नागपूर: विदर्भातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भातील दहा लोकसभेच्या जागांपैकी सात जागा काँग्रेस लढवणार, तर तीन जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. यावर दोन्ही पक्षांची चर्चा पूर्ण झाली. पण वर्धा लोकसभेच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दावा केल्यानं, वाद निर्माण झाला आहे. विदर्भ हा परंपरेनं काँग्रेसचा गड राहिला आहे. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत …

विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं जागावाटप!

नागपूर: विदर्भातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भातील दहा लोकसभेच्या जागांपैकी सात जागा काँग्रेस लढवणार, तर तीन जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. यावर दोन्ही पक्षांची चर्चा पूर्ण झाली. पण वर्धा लोकसभेच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दावा केल्यानं, वाद निर्माण झाला आहे.

विदर्भ हा परंपरेनं काँग्रेसचा गड राहिला आहे. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या युतीनं या गडाला हादरे दिले आणि विदर्भाचा गड भाजपनं काबीज केला. आता आगामी लोसकभा निवडणुकीत हा गड पुन्हा परत मिळवण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विदर्भातील जागावाटपाबाबत चर्चाही पूर्ण झाली. विदर्भातील 10 लोकसभेच्या जागांपैकी सात जागा काँग्रेस लढणार आहे, तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वर्धा लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केलाय, त्यामुळे काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे.

विदर्भात काँग्रेसच्या वाट्याचे लोकसभा मतदारसंघ

  1. नागपूर
  2. वर्धा
  3. चंद्रपूर
  4. रामटेक
  5. गडचिरोली-चिमूर
  6. अकोला
  7. यवतमाळ-वाशिम

विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या जागा लढवणार

  1. भंडारा – गोंदिया
  2.  बुलडाणा
  3. अमरावती

विदर्भात आघाडीच्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वर्धा लोकसभा जागेवर दावा केल्यानं पुन्हा तिढा निर्माण झालाय. वर्धा लोकसभा सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे, आता स्वाभिमानीसाठी काँग्रेस आपली हक्काची जागा सोडणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *