AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलही गेलं, तूपही जाण्याची चिन्हं, भाजपच्या वेटिंगवरील 3 आमदार स्वपक्षासाठीही परके?

भाजपाची मेगाभरती झाली मात्र त्या मेगाभरतीत जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांचा (BJP Waiting MLA) भाजपप्रवेश झालाच नाही. तिन्हीही आमदारांची खूप चर्चा झाली खरी मात्र त्यांचा अद्याप भाजपप्रवेश (BJP Waiting MLA) रखडला आहे.

तेलही गेलं, तूपही जाण्याची चिन्हं, भाजपच्या वेटिंगवरील 3 आमदार स्वपक्षासाठीही परके?
| Updated on: Oct 15, 2019 | 12:20 PM
Share

सोलापूर : भाजपाची मेगाभरती झाली मात्र त्या मेगाभरतीत जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांचा (BJP Waiting MLA) भाजपप्रवेश झालाच नाही. तिन्हीही आमदारांची खूप चर्चा झाली खरी मात्र त्यांचा अद्याप भाजपप्रवेश (BJP Waiting MLA) रखडला आहे. हे तिघेही आमदार सध्या मुंबईत देव पाण्यात ठेऊन पक्षप्रवेशासाठी युतीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

अक्कलकोटचे काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे,पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके,माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांचा अद्याप प्रवेश न झाल्याने ते स्वपक्षासाठीही परके होण्याची चिन्हं आहेत.

देशात आणि राज्यात 2014 मध्ये सुरु झालेल्या मोदी लाटेचा झंजावात अद्यापही सुरु आहे. या लाटेत मतदारांनी काहींना दूर केलं तर काही जण सत्तेच्या आसपासही आता फिरकत नाहीत. रोज काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शिलेदार भाजप आणि शिवसेनेच्या गोठत सामील होत आहेत. त्यात सोलापूर जिल्हाही मागे कसा राहणार, जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील,दिलीप सोपल, रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर अक्कलकोटचे काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे,पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके,माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आणि तसे तिघांनी संकेतही दिले.

सिद्धाराम म्हेत्रे

  •  अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसवर नाराज असल्याचं कार्यकर्ता मेळावा घेऊन स्पष्ट केलं होत.
  • त्यांनी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली होती.
  • पक्ष बदलासाठी मतदारसंघात आढावासुद्धा घेतला होता.
  • पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते.
  • यांनी सुद्धा भाजप प्रवेशासाठीमुंबईत तळ ठोकला आहे, अशी चर्चा आहे
  • मात्र म्हेत्रेंच्या प्रवेशाला स्थानिक भाजप नेते सचिन कल्याणशेट्टींनी विरोध केला आहे.

भारत भालके

  •  पंढरपूर- मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत
  • भारत भालके यांनी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली होती.
  • काँग्रेसच्या अनेक बैठकांना पाठ फिरवली
  • भारत भालकेसुद्धा भाजप प्रवेशासाठी मुंबईत तळ ठोकून असल्याची चर्चा आहे
  • मात्र भारत भालकेंच्या प्रवेशाला परिचारक गटाने मोठा विरोध केला आहे.

बबन शिंदे

  • राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी सुद्धा शरद पवारांच्या सभेला दांडी मारली होती
  • अजित पवारांच्या उपस्थितीतइच्छुकांच्या मुलाखतीला सुद्धा दांडी मारली होती
  • शरद पवारांनी सुद्धा बबन शिंदेंवर नाराजगी दाखवत भेट नाकारली होती.
  • बबन शिंदे सुद्धा सध्या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे, त्यासाठी ते मुंबईत तळ ठोकून आहेत.

तीन आमदारांची धाकधूक

ते तिघेही आमदार सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. माढा आणि शिवसेना मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. अद्याप युतीचा निर्णय झाला नाही. त्यामुळे युती झाली तर सेनेकडून माढा ऐवजी  पंढरपूरची जागा भाजपला सुटणार का, या द्विधा मनस्थितीत आमदार भारत भालके आणि आमदार बबन शिंदे आहेत. तर सिद्धाराम म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध होत आहे. त्यामुळे ते तिघेही मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र युतीची घोषणा झाली नसल्यामुळे या तिघांना भाजपच्या पक्षनेतृत्वाने तूर्तास होल्डवर ठेवलं आहे. त्यामुळे या तिघांची धाकधूक वाढली आहे.

एकीकडे भाजपच्या पक्षप्रवेशासाठी  आतूर असलेल्या या तिन्ही आमदारांच्या अशा भूमिकेमुळे त्यांच्या मूळपक्षात सुद्धा कमालीची नाराजी पसरली आहे. मात्र ते कोणत्याही पक्षात गेले काय, राहिले काय, शेवटी या तिघांचे भवित्यव्य ठरवणार आहेत ते मतदारच.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.