11 मंत्रिपदं, विधानसभा अध्यक्ष, महामंडळामध्ये वाटा, काँग्रेसच्या शिवसेनेसमोर 12 अटी

| Updated on: Nov 12, 2019 | 1:51 PM

या भेटीपूर्वी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने काही अटी शर्थी ठेवल्या आहेत. काँग्रेसने 11 मंत्रिपदं, विधानसभा अध्यक्षपद, किमान समान कार्यक्रम अशा प्रमुख अटी ठेवल्या आहेत.

11 मंत्रिपदं, विधानसभा अध्यक्ष, महामंडळामध्ये वाटा, काँग्रेसच्या शिवसेनेसमोर 12 अटी
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं (Congress terms and conditions before Shiv Sena ) अद्याप ठरलेलं नाही. ना काँग्रेसने, ना राष्ट्रवादीने पाठिंब्याचं पत्र शिवसेनेलं दिलं. त्यामुळे शिवसेनेने (Congress terms and conditions before Shiv Sena ) राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला असला, तरी अद्याप आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही.

दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु आहे. राज्यपालांनी राष्ट्रवादीला आज निमंत्रण देऊन 8.30 पर्यंतची वेळ दिली आहे. या सर्व चर्चा सुरु असताना, काँग्रेसचे दिल्लीचे बडे नेते मुंबईत येत आहेत. काँग्रेसचे खासदार अहमद पटेल, के सी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हे मुंबईत येऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत.

या भेटीपूर्वी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने काही अटी शर्थी ठेवल्या आहेत. काँग्रेसने 11 मंत्रिपदं, विधानसभा अध्यक्षपद, किमान समान कार्यक्रम अशा प्रमुख अटी ठेवल्या आहेत.

काँग्रेसच्या 12 अटी

1) किमान समान कार्यक्रम

2) समन्वय समिती

3)  सत्तावाटपाचं सूत्र – 4 आमदारांमागे 1 मंत्रिपद म्हणजे 44 आमदारांनुसार 11 मंत्रिपदे

4) महापालिका निवडणुकांसाठी फॉर्म्युला तयार करणे

5) महामंडळांमध्येही काँग्रेसला वाटा हवा

6) शेतकरी हित आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र येत असल्याचं नमूद करणं

7) पाठिंब्याची पत्र उद्या देण्याची शक्यता

8) सोनिया गांधी यांची 15 काँग्रेस आमदारांना फोन करुन चर्चा

9) मल्लिकार्जुन खर्गे यांचा सेनेसोबतच्या युतीला विरोध, मात्र अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि शेवटी सुशीलकुमार शिंदे यांनी मनवल्यानंतर सोनिया गांधी युतीसाठी तयार

10) ठाकरे कुटुंबातील शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला काँग्रेसचा विरोध. जर मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबातील असेल तर रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे असेल अशी काँग्रेसची धारणा

11) काँग्रेसला वाटतं, शिवसेना ड्रायव्हिंग सीटवर, राष्ट्रवादीकडे चावी आणि काँग्रेसकडे स्वतंत्र ब्रेक सिस्टिम असावी.

12) काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचं बाहेरुन पाठिंबा देण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्याचं मत