खडसेंचा गौप्यस्फोट, “काँग्रेसकडून सहाव्या जागेची ऑफर होती, भाजप आमदारही क्रॉस वोटिंग करणार होते”

| Updated on: May 12, 2020 | 12:07 PM

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर (Eknath Khadse claim BJP MLAs cross voting) आली होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

खडसेंचा गौप्यस्फोट, काँग्रेसकडून सहाव्या जागेची ऑफर होती, भाजप आमदारही क्रॉस वोटिंग करणार होते
Follow us on

जळगाव :विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर (Eknath Khadse claim BJP MLAs cross voting) आली होती. भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी देखील क्रॉस वोटिंग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते”, असा गौप्यस्फोट भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने पत्ता कापल्यानंतर एकनाथ खडसे दररोज नवनवे गौप्यस्फोट करत आहेत.

सोमवारी दुपारी त्यांनी मुक्ताईनगरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पुन्हा एक गौप्यस्फोट करत, राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. खडसे म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने ज्या इच्छुकांच्या नावांच्या शिफारशी केल्या होत्या, त्यात आता ज्या चार जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांची नावे नव्हती. त्यात माझ्यासह इतर तिघांची नावे होती. मात्र, निवड समितीने आमची नावे टाळून नव्या लोकांना उमेदवारी दिली. त्यावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. राज्यसभेच्या वेळी आम्हाला सांगण्यात आले होते की तुम्हाला आता नाही तर विधानपरिषदेवर संधी दिली जाईल. मात्र, आताही आमची नावे असताना आम्हाला संधी नाकारण्यात येऊन दगाफटका झाला. याचे दुःख नाही. पण पक्षात अनेक निष्ठावान असताना ज्यांनी पक्षाला शिव्या घातल्या, पक्षविरोधी कारवाया केल्या, अशा लोकांना संधी दिल्याने वाईट वाटले. हा एकप्रकारे निष्ठावंतांवर अन्याय आहे” (Eknath Khadse claim BJP MLAs cross voting)

मी काँग्रेसची ऑफर नाकारली
काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी देखील क्रॉस वोटिंग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते. परंतु, मी काँग्रेसची ऑफर नाकारत काँग्रेसकडून उभं राहण्यास नकार दिला, असा दावा एकनाथ खडसेंनी केला.

वाचा :  एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता  

विधानसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेचंही तिकीट नाकारलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांशी चर्चा करुन खडसे पुढील राजकीय वाटचाल ठरवण्याची चिन्हं आहेत.

विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक असतानाही उमेदवारी डावलल्याने एकनाथ खडसे खवळले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत योग्य व्यक्तींना उमेदवारी न मिळाल्याने एकनाथ खडसे यांची नाराजी उघड झाली होती. एकनाथ खडसे यांना विविध पक्षांकडून पुन्हा ऑफर येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करण्याची शक्यता बळावली आहे.

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काल शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 10 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 14 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली. भाजपने 4 आणि महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. याशिवाय खबरदारी म्हणून राजकीय पक्षांनी डमी अर्जही दाखल केले आहेत. संख्याबळानुसार आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण 9 जागांसाठी येत्या दि. 21 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता.

कोणत्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण?

  • उद्धव ठाकरे – शिवसेना
  • निलम गोऱ्हे – शिवसेना
  • राजेश राठोड – काँग्रेस
  • शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी
  • अमोल मिटकरी – राष्ट्रवादी
  • रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप
  • गोपीचंद पडळकर – भाजप
  • प्रवीण दटके – भाजप
  • डॉ. अजित गोपछेडे – भाजप

(Eknath Khadse claim BJP MLAs cross voting)

संबंधित बातम्या   

Uddhav Thackeray property | दोन घरं, एक फार्म हाऊस, एकही वाहन नाही, उद्धव ठाकरेंची संपत्ती किती?

विधानपरिषदेसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल, भाजपकडून सहा, तर राष्ट्रवादीचे तीन अर्ज  

MLC Election live | मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल, संपूर्ण ठाकरे कुटुंब विधानभवनात उपस्थित  

MLC Polls : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, काँग्रेसने 6 व्या जागेचा आग्रह सोडला