AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केजरीवालाचं ट्वीट.. लव्ह लेटर… दिल्लीत चर्चा, नेटकऱ्यांनीही सुनावलं

LG साहेब थोडा तो Chill करे... असं वक्तव्य केजरीवालांनी ट्विटमध्ये केलंय. यावरून मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहे.

केजरीवालाचं ट्वीट.. लव्ह लेटर... दिल्लीत चर्चा, नेटकऱ्यांनीही सुनावलं
Image Credit source: social media
| Updated on: Oct 07, 2022 | 8:54 AM
Share

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi CM) अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) आणि केंद्र सरकारमधील आरोप प्रत्यारोप सुरूच असतात. मात्र केजरीवाल यांनी नुकताच केलेला आरोप आणि उप राज्यपालांवरचं भाष्य सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात (Delhi Politics) चर्तेत आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून केजरीवाल आणि या राज्यपालांचं कधीच जमलं नाही. त्यांच्या या स्पेशल नात्यावर केजरीवालांनी ट्वीट केलंय..

उप राज्यपालांबाबत केजरीवालांनी लिहिलंय… एलजी साहब रोज मुझे जितना डांटते है, उतना तो मेरी पत्नी भी मुझे डाटती नाही….

तर पुढच्या ओळीत केजरीवालांनी लिहिलंय, मागील सहा महिन्यात एलजी साहेबांनी मला जेवढे लव्ह लेटर लिहिलेत. तेवढे पूर्ण आयुष्यात माझ्या पत्नीनेही मला लिहिले नाहीत.

केजरीवालांच्या या ट्वीटवरून नेटकऱ्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हे ‘छिछोरापन’ असल्याचं म्हटलंय.

तर काही म्हणालेत मुख्यमंत्री है या मसखरा….

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनीही काल उप राज्यपालांवर जोरदार टीका केली.

वाहनांकडून वसूल करण्यात आलेल्या टोलमध्ये 6 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय. हा भ्रष्टाचार भाजपने केलाय, याकडे उपराज्यपालांचं लक्ष नाही? असा सवाल सिसोदियांनी केलाय.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तच्या राजघाट आणि विजय घाट येथील कार्यक्रमात अरविंद केजरीवाल उपस्थित नव्हते. यावरून उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी एक पत्र लिहून हे अपमानास्पद असल्याचे म्हटले. त्यानंतर केजरीवालांनी हे ट्विट केलंय.

LG साहेब थोडा तो Chill करे… असं वक्तव्य केजरीवालांनी ट्विटमध्ये केलंय. यावरून मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.