‘मशाल’ ठाकरे गटाचीच; दिल्ली हायकोर्टाने समता पार्टीची याचिका फेटाळली

| Updated on: Nov 03, 2022 | 1:43 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने केलेला दावा दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावला आहे.

मशाल ठाकरे गटाचीच; दिल्ली हायकोर्टाने समता पार्टीची याचिका फेटाळली
Follow us on

नवी दिल्ली :  शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने (​​Samata Party) केलेला दावा दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. हा समता पार्टीसाठी दुसरा धक्का आहे. यापू्र्वी देखील समता पार्टीच्या वतीने मशाल या चिन्हावर दावा करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ती याचिका देखील फेटाळण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दिल्ली हायकोर्टाने समता पार्टीची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धणुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यानं निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धणुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मशाल हे चिन्ह मिळालं. मात्र या चिन्हावर समता पार्टीने देखील दावा केल्यानं ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या होत्या. अखेर समता पार्टीने या प्रकरणात दिल्ली हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. आता दिल्ली हायकोर्टाच्या याचिकेविरोधात समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

मशाल चिन्हावर समता पार्टीचा दावा

निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं. त्यानंतर या चिन्हावर समता पार्टीने देखील दावा केला.  समता पार्टीकडून हे चिन्हा ठाकरे गटाला देण्यावर अक्षेप घेण्यात आला होता. मात्र दिल्ली हायकोर्टाने समता पार्टीची याचिका फेटाळून लावली आहे.