‘मग लांबून बोल ना, त्यांचं काय बाकीचं नाही, तुझं सांग पटकन’, अजित पवारांनी मनसे नगरसेवकाला झापलं

| Updated on: Aug 08, 2020 | 11:59 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सडेतोड स्वभाव सर्वांनाच परिचीत आहे. त्याची पुन्हा एकदा प्रचिती पिंपरी चिंचवडमध्ये आली. Ajit Pawar angry on MNS corporator

मग लांबून बोल ना, त्यांचं काय बाकीचं नाही, तुझं सांग पटकन, अजित पवारांनी मनसे नगरसेवकाला झापलं
Follow us on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सडेतोड स्वभाव सर्वांनाच परिचीत आहे. त्याची पुन्हा एकदा प्रचिती पिंपरी चिंचवडमध्ये आली. सोशल डिस्टन्सिंगवरुन अजित पवार चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी पिंपरीत मनसे नगरसेवक सचिन चिखले यांना सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने चांगलंच सुनावलं.

अजित पवार काल पिंपरी चिंचवडमध्ये जम्बो कोव्हिड सेंटरची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी मनसे नगरसेवक सचिन चिखले हे काही मुद्दे घेऊन अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते जवळ जाऊन संवाद साधत असताना, सोशल डिस्टन्सिंग पाळत न पाळल्याने अजित पवार भडकले.

“मग लांबून बोल ना, फिजिकल डिस्टन्सिंगचं बाकीचे बघतायत, त्यांचं काय बाकीचं नाही, तुझं सांग पटकन”, असं म्हणत अजित पवारांनी नगरसेवकाला चांगलंच झापलं. याशिवाय फिजिकल डिस्टन्स ठेव की आमचे चार ते पाच मंत्री बाधित झालेत, असंही अजित पवारांनी सुनावलं.

जम्बो कोव्हिड सेंटरची पाहणी

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील नेहरुनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडिअमवर ऑक्सिजन, आयसीयू बेडची सुविधा असलेल्या एक हजार बेडचे जम्बो कोव्हिड रुग्णालय उभारण्यात येत आहे.

हेही वाचा : हॅलो, उद्धव म्हस्के बोलतोय, तुम्ही शब्द दिला होता…अजित पवारांना फोन, दादा म्हणाले, तुम्ही भेटा, परिस्थिती सांगतो..

पाहणी करण्यासाठी आलेल्या अजित पवार यांनी “जंबो कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासाठी कामगार कुठून मागवले?” असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला. “आपल्याकडे दोन टीम आहेत. राजस्थान आणि महाराष्ट्राचे आहेत” असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. “महाराष्ट्राच्या कोणत्या भागातील आहेत?” असे पुढे दादांनी विचारले. यावर “कामगार कोकण आणि मुंबईत राहणारे परप्रांतीय आहेत” असे उत्तर त्यांना मिळाले.

संबंधित बातम्या 

“कामगार कुठले आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या भागातले?” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा