“भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत”, देवेंद्र फडणवीसांसंह भाजप आक्रमक

| Updated on: Feb 08, 2021 | 3:52 PM

"भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे", अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Devendra Fadanvis Anil Deshmukh

भारतरत्नांची चौकशी करणारे असे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत, देवेंद्र फडणवीसांसंह भाजप आक्रमक
अतुल भातखळकर, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार
Follow us on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या सेलिब्रिटीजची चौकशी करण्याच्या गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निर्णयावर टीकस्त्र सोडलं आहे. “भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे”, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी ट्विट द्वारे महाविकास आघाडीवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आशिष शेलार आणि अतुल भातखळकर देखील आक्रमक झाले आहेत.(Devendra Fadanvis, Ashish Shelar Atul Bhathkhalkar slams Anil Deshmukh and MVA Government over inquiry of celebrities tweets)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राज्य सरकारचा सेलिब्रेटीच्या ट्विट करण्या निर्णय हा संतापजनक ? असून कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? अशा प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, असा संताप देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!”

भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील सेलिब्रेटीजच्या ट्विट करण्याच्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे. “आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरजी यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले”., असं आशिष शेलार म्हणाले.

“कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर”, आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!” अशा शब्दात आशिष शेलारांनी राज्य सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ अतुल भातखळकर यांनी देखील अनिल देशमुखांच्या निर्णयावर टीका केली आहे. “अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे.देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा इशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते.”, असं वक्तव्य अतुल भातखळकरांनी केलं आहे.

अनिल देशमुखांचा निर्णय काय?

पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.

सायना नेहवाल, अक्षयचे ट्विट सारखे कसे?

यावेळी सावंत यांनी देशमुख यांना बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि अक्षय कुमार यांचं ट्विट दाखवलं. दोघांचे ट्विट शब्द न् शब्द सारखे आहे. दोघेही एकाच वेळी सेम ट्विट का करतील? सुनील शेट्टीने तर हितेश जैन नावाच्या व्यक्तीला ट्विटमध्ये टॅग केलं आहे. हा हितेश जैन भाजपचा कार्यकर्ता असून यावरून केवळ भाजपच्या दबावाखालीच हे ट्विट करण्यात आल्याचं स्पष्ट होतं, असं सावंत यांनी सांगितलं. आपल्या सेलिब्रिटीजवर कुणाचा दबाव आहे का? कोणत्या प्रकारचा दबाव आहे? याचीही चौकशी झाली पाहिजे, असं सावंत म्हणाले. पूर्वी अंडरवर्ल्डचा बॉलिवूडवर दबाव होता. आता सरकारचा दबाव आला का? असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

सेलिब्रिटीजच्या ‘त्या’ ट्विटची चौकशी होणार; अनिल देशमुखांचे आदेश

राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, फडणवीसांची जहरी टीका; ठाकरे सरकारला घायाळ करणारे १० मोठे मुद्दे

(Devendra Fadanvis, Ashish Shelar Atul Bhathkhalkar slams Anil Deshmukh and MVA Government over inquiry of celebrities tweets)