“कर्नाटक सरकारला कळवलंय, मी येतोय”, खासदार धैर्यशील माने बेळगावला जाणार

खासदार धैर्यशील माने बेळगावला जाणार...

कर्नाटक सरकारला कळवलंय, मी येतोय, खासदार धैर्यशील माने बेळगावला जाणार
| Edited By: | Updated on: Dec 18, 2022 | 12:58 PM

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Seemavad) मागच्या काही दिवसांपासून चिघळला आहे. दोन्ही राज्याकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. अशात खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) बेळगावला जाणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एका कार्यक्रमासाठी ते बेळगावला जाणार आहेत.

मी बेळगावला येत असल्याचं कर्नाटक सरकारला कळवलं आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने लढाई जिवंत ठेवलं. मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान भूषवण्यासाठी जाणार आहे. मी येत असल्याचं कळवलं आहे, पण कर्नाटक सरकारकडून प्रतिसाद आलेला नाही, असं धैर्यशील माने यांनी सांगितलं आहे.

आम्ही प्रोटोकॉल पाळण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही जाण्याचा निर्णय घेतलाय. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करण्यासाठी आम्ही तिथे जात नाही. स्वातंत्र्यानंतरचा सीमाप्रश्न ही सर्वात मोठी लढाई आहे. महाराष्ट्र शासन पूर्ण ताकतीनिशी सीमावासियांच्या पाठीशी आहे. उद्याचा दौरा शक्तिप्रदर्शनासाठी नाही. तर बेळगाववासियांनी हाक दिल्यानंतर तिथे जाणं माझी नैतिक जबाबदारी आहे, असं धैर्यशील माने म्हणालेत.

आज ग्रामपंचायल निवडणुकीसाठी मतदान होतंय. ग्रामपंचायतीची नगरपालिका व्हावी या मागणीसाठी शाहूवाडी ग्रामपंचायतीने मतदानावर बहिष्कार टाकलाय. त्यावरही धैर्यशील माने बोलते झाले. तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायती करण्याचा निर्णय याआधीच झालाय. पण शाहूवाडी चा नगरपालिका अद्याप झालेली नाही. आपलं मत लोकशाही पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न शाहूवाडीकरांनी केलाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील, असं धैर्यशील म्हणाले आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणून जी भूमिका घ्यावी लागेल ती घेईन. मुख्यमंत्र्यांना नुकतंच याबाबत पत्र देखील दिलं आहे. शाहूवाडीकरांची मागणी लवकरच पूर्ण होईल एवढा विश्वास लोकप्रतिनिधी म्हणून देतो, असंही ते म्हणालेत.