धनंजय मुंडेंचे बारामतीत पवार कुटुंबासह बर्थडे सेलिब्रेशन

| Updated on: Jul 16, 2020 | 5:20 PM

राष्ट्रवादी हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा 'आधारवड' कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो, असे ट्वीट धनंजय मुंडेंनी केले आहे.

धनंजय मुंडेंचे बारामतीत पवार कुटुंबासह बर्थडे सेलिब्रेशन
Follow us on

बारामती : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वाढदिवसाचा दुसऱ्या दिवशी बारामतीत पवार कुटुंबासह सेलिब्रेशन केले. “सुप्रियाताईंनी केक आणला आणि पवार साहेबांनी तो भरवला” याचा आनंद धनंजय मुंडेंनी व्यक्त केला आहे. (Dhananjay Munde Birthday Celebration in Baramati)

“कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया सुळे ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. राष्ट्रवादी हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा ‘आधारवड’ कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई ! असाच आशीर्वाद राहू द्या” असे ट्वीट धनंजय मुंडेंनी केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे

“यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका. कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करु नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या,” असे आवाहन धनंजय मुंडे यांनी आधीच कार्यकर्त्यांना केलं होतं. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे कोरोनामुक्त झाले आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका ही आपणा सर्वांना विनंती आहे. बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे, यातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी आहेत तिथेच राहून प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत,” असं धनंजय मुंडे म्हणाले होते.

“तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला लढण्याचे बळ देतात, परंतु यावर्षी कोरोनाशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच, कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी,” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले होते.