रणजितसिंह मोहिते पाटलांचे चुलत भाऊ धवलसिंह राष्ट्रवादीच्या वाटेवर

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय सिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केलाय. पण या प्रवेशामुळे नाराज असलेले रणजितसिंहांचे चुलतभाऊ धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. धवलसिंह यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश […]

रणजितसिंह मोहिते पाटलांचे चुलत भाऊ धवलसिंह राष्ट्रवादीच्या वाटेवर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय सिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केलाय. पण या प्रवेशामुळे नाराज असलेले रणजितसिंहांचे चुलतभाऊ धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. धवलसिंह यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जातोय.

धवलसिंह मोहिते पाटील हे दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आहेत. प्रतापसिंह हे 1995 ला युती सरकारच्या काळात सहकारमंत्री होते. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नंतर ते काँग्रेसमध्येच राहिले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापसिंह यांना खासदारकीसाठी उभं रहायचं होतं. पण विजयसिंह यांनी रणजितसिंहांचं नाव पुढे केलं. त्यामुळे मोहिते पाटील घराण्यात वादाची पहिली ठिणगी पडली.

मोहिते पाटील घराण्याच्या या वादात शरद पवारांनी माढ्याची जागा लढवली. पण या वादानंतर मोहिते पाटील घराण्यातील वाद वाढतच गेला. धवलसिंह पाटलांची जनसेवा ही संस्था असून ते संस्थापक अध्यक्ष आहेत. दोन वर्षांपूर्वीच रणजितसिंह यांनी निवडणूक लावून शंकरराव मोहिते हा कारखाना धवलसिंह यांच्याकडून काढून घेतला. कारखान्याच्या निवडणुकीत रणजितसिंह यांचा विजय झाला.

धवलसिंह आणि रणजितसिंह यांचं जमत नाही. माढ्याची जागा रणजितसिंह यांनी लढवल्यास युती धर्म म्हणून धवलसिंहांनाही या जागेवर उभा असलेल्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल. म्हणूनच धवलसिंह हे लवकरच शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.