Disha Salian case: दिशा सालियान प्रकरणी मोठा ट्विस्ट? थेट प्रत्यक्षदर्शी… नेत्याची पोस्ट व्हायरल

Disha Salian case: दिशा सालियन प्रकरणाचा तपास हा मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यापासून अनेक अपडेट समोर येत आहेत. आता या प्रकरणी एका नेत्याने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Disha Salian case: दिशा सालियान प्रकरणी मोठा ट्विस्ट? थेट प्रत्यक्षदर्शी... नेत्याची पोस्ट व्हायरल
Disha Salian
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 1:58 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणावरुन वाद पेटला आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना 500 कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे. ती ही नोटीस घेऊन आज मातोश्रीवर जाणार असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाबाबत एका बड्या नेत्याने केलेल्या पोस्टने खळबळ माजली आहे.

शिवसेना नेते अखिलेश चित्रे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, सतीश सालियन यांच्या वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजीच्या Exhibit ‘A’ मधील पान क्रमांक २३३, मुद्दा क्रमांक २ मध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की दिशा सलियन यांचा मृत्यू नैसर्गिक नसून सामूहिक अत्याचार करून नंतर खून करण्यात आल्याबाबतचे आरोप प्रत्यक्षदर्शी साक्षीदार केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि इतर अनेक लोकांनी केले आहेत.

पुढे त्यांनी म्हटले की, ह्याचा सरळ-सरळ अर्थ होतो कि, त्या सामूहिक अत्याचाराचे आणि खुनाचे प्रत्यक्षदर्शी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आहेत. हे सर्व असताना हे सगळं होत असल्याचे ते कसे पाहू शकतात. सतीश सालियन यांच्या वकिलांनी सादर केलेल्या या कागदपत्रातील उल्लेखाच्या अनुषंगाने काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. असा सामूहिक अत्याचार होताना हे प्रत्यक्षदर्शी महाशय शांत राहून अत्याचार का पहात बसले होते? हस्तक्षेप का केला नाही? खून होताना दिसतोय तरी मान्यवर प्रत्यक्षदर्शीने ते रोखण्यासाठी काहीच का केलं नाही?

पोस्टच्या शेवटी त्यांनी म्हटले की, सामूहिक अत्याचार पाहिल्यानंतर पीडितेला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी कोणती पावले उचलण्यात आली? अशी घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा असल्यास, त्यानंतर तातडीने पोलिसांशी संपर्क का साधण्यात आला नाही? असा अत्याचार आणि खून पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसांच्या मानसिक स्थितीवर काहीअंशी परिणाम होतो मग प्रत्यक्षदर्शीं इतके नोर्मल कसे? असेच ह्यांनी किती सामूहिक अत्याचार आणि खून आयुष्यात प्रत्यक्षदर्शी म्हणून पाहिले आहेत? असा भयंकर अत्याचार आणि खून प्रत्यक्ष पाहिल्यानंतरही एखादी व्यक्ती पूर्णपणे सामान्यपणे वागत असेल, तर अशा वर्तनाला मानसशास्त्रीय भाषेत काय म्हणतात?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us