योगी सरकार बरखास्त करुन उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; शिवसेनेची मागणी

| Updated on: Oct 02, 2020 | 6:59 PM

हाथरसमधील पीडित मुलीवरील पाशवी बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आज दुपारी शिवसेनेने चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले.

योगी सरकार बरखास्त करुन उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; शिवसेनेची मागणी
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद आज मुंबईतदेखील उमटले. हाथरसमधील (Hathras) पीडित मुलीवरील पाशवी बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आज दुपारी शिवसेनेने (Shivsena) चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाहेर आंदोलन केले. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली. (Dismiss the Yogi government and impose presidential rule in Uttar Pradesh : ShivSena)

शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी योगी सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करणारे आता कुठे गेले? त्यांना उत्तर प्रदेशमधील अराजकता दिसत नाही का? असा सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी केला.

उत्तर प्रदेशमधील सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने यावेळी केली. निषेधाचे फलक हातात घेऊन शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी योगी सरकार व उत्तर प्रदेश पोलिसांचा निषेध नोंदवला.

‘त्यांचा’ सत्यानाश होईल; योगी आदित्यनाथांचा संताप

हाथरस येथे झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरलेली असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यावर अखेर भाष्य केलं आहे. (Yogi Adityanath on Womens Safety in UP) उत्तर प्रदेशातील माता-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचविण्याचा विचारसुद्धा करणाऱ्यांचा सत्यानाश होईल, असा संताप योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून हाथरस येथील घटनेवर भाष्य केलं आहे. उत्तर प्रदेशातील माता-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचविण्याचा विचार सुद्धा करणाऱ्यांचा सत्यानाश होईल. लोक भविष्यातही लक्षात ठेवतील अशी शिक्षा या लोकांना देऊ. राज्यातील माता-भगिनींच्या संरक्षण आणि विकासासाठी उत्तर प्रदेश सरकार वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प असून वचन आहे, असं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

दरम्यान, आदित्यनाथ यांनी ट्विट करून महिलांच्या सुरक्षेची हमी दिली असली तरी हाथरस आणि बलरामपूर घटनेचा या ट्विटमध्ये उल्लेख केला नाही. तसेच आतापर्यंत आऱोपींविरोधात काय कारवाई केली? किंवा पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला त्यावर काहीही भाष्य न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संबंधित बातम्या

Hathras | घरात डांबून कुटुंबाला मारहाण, फोनही काढून घेतले, हाथरस पीडितेच्या भावाचा आरोप

हाथरस अत्याचारातील पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबईत मनसे आक्रमक

राहुल गांधींची कॉलर पकडून धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीवरील गँगरेप, संजय राऊतांचा संताप

(Dismiss the Yogi government and impose presidential rule in Uttar Pradesh : ShivSena)