मनोज जरांगे स्वत:ला बॅरिस्टर समजतात की अ‍ॅटर्नी जनरल? वकील गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल

| Updated on: Dec 10, 2023 | 4:36 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने महाराष्ट्रात अशांतता पसरत आहे. त्यांच्यावरही कायद्याचे नियम लागू आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीर आंदोलनाची कोणालाही परवानगी नाही, त्यांनी विचारांची लढाई विचारांनी करावी अशी भूमिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली आहे. इतकं सगळं करूनही जर जरांगे यांच्यावर कारवाई होणार नसेल तर हे असेच चालू रहाणार असल्याचेही सदावर्ते यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे स्वत:ला बॅरिस्टर समजतात की अ‍ॅटर्नी जनरल? वकील गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल
Gunratna Sadavarte
Follow us on

निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 10 डिसेंबर 2023 : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण होत आहे. विचारांची लढाई विचाराने लढायला हवी आहे. जरांगे पाटील इतरांवर खालच्या स्तरातून टीका करीत आहेत. जरांगे सर्वांची लायकी काढत आहेत. आधी पोलिसांना लक्ष्य केले. आता आमदारांच्या जातीवर जाऊन बोलत आहेत. जरांगे स्वत:ला बॅरिस्टर समजत आहेत की ॲटर्नी जनरल असा सवाल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

जरांगे पाटील हे मग्रुरीतून बोलत आहेत, हुकूमशाहीतून बोलत आहेत. कोणाला मारून आणि गाड्या फोडून आरक्षण मिळत नाही. जरांगे यांनी महाराष्ट्रातील वातावरण खराब केले आहे. रोज ते याला बघून घेतो, त्याला बघून घेतो अशा धमक्या देत आहेत. बंदूक आणि कोयते सापडलेले सोबती जरांगेचे आहे. आतापर्यंत कायदेशीर बाबीमध्ये जरांगे यांना बोलवले गेलेले नाही. आतापर्यंत सरकारने सोयी-सवलत दिली आहे. पण हे सर्वांचे लायकी काढत निघालेत, हे चालणार नाही बेकायदेशीर आंदोलन करण्याची तरतूद नाही हे जरांगे यांनी लक्षात ठेवावे असेही वकील सदावर्ते यांनी म्हटले आहे.

जरांगेच्या आंदोलनाने अशांतता निर्माण होत आहे. अहमदनगरात एका कुटुंबाला ॲट्रॉसिटीला सामोरे जावे लागले. तुळशी गावात कुटुंबावर अत्याचार झाला आहे. याचा योग्य तपास झाला तर जरांगेपर्यंत पोहचेल. जरांगे यांनी किती कायदेशीर ज्ञान आहे हे बोलण्याची वेळ आली आहे. आमदारावर चप्पल फेक करणे कोणत्या प्रकारची मानसिकता आणि कोणत्या प्रकारचे मागासलेपण आहे असाही सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

जरांगेबाबत डेमोक्रसी नाही तर….

भुजबळांचा अपमान करुन जरांगे हे दर्शवित आहेत की आपण मागास नाही. छगन भुजबळ यांना कलंकित म्हणून देखील जरांगे यांच्यावर कारवाई होत नाही. आमदाराच्या जातीवर जाऊन बोलत आहेत. प्रवीण दरेकर लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी जात पाहून काम करत नसतात हे जरांगे यांनी लक्षात ठेवावे. आंदोलन कसे करावे याविषयी नियम आहेत. तोडफोड जाळपोळ करणाऱ्याकडून दंड वसुली केली जाते. जोपर्यंत कायद्याच्या चौकटीत जरांगे यांना आणत नाहीत तोपर्यंत हे असंच चालू रहाणार आहे. जरांगेच्या बाबतीत डेमोक्रॉसी नाही तर मोबॉक्रॉसी झाली आहे अशी टीका वकील सदावर्ते यांनी केली आहे.