AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न होऊन 12 तासही झाले नाही… कार अपघातात नवरा आणि नवरीचा मृत्यू; लगीन घरी मातम

अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना कॉल केला. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी नंतर जखमींना कसेतरी कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. लग्नसमारंभानंतर हे सर्वजण घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.

लग्न होऊन 12 तासही झाले नाही... कार अपघातात नवरा आणि नवरीचा मृत्यू; लगीन घरी मातम
road accidentImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Dec 10, 2023 | 3:04 PM
Share

छत्तीसगड | 10 डिसेंबर 2023 : रस्ते अपघातात दरवर्षी अनेक जीव हकनाक जात आहेत. यासाठी मानवी चुकासोबतच रस्त्याचे बांधकाम देखील जबाबदार असते. आता छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात रविवारी सकाळी भीषण अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. लग्नावरुन परतणाऱ्या एका कारला ट्रकने जोरदार ठोकर दिल्याने झालेल्या भयंकर अपघातात कारचा चक्काचूर होऊन आत बसलेले नवरा आणि नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही कार रामगडहून अकलतराच्या दिशेने जात होती. या अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना अपघाताची माहीती दिली.

छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातील मुलमुला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पकरिया जंगला दरम्यान एका कारला ट्रकने रविवारी सकाळी धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहचले तर घटनास्थळावरील उपस्थित लोकांच्या मदतीने अपघाग्रस्तांना मोठ्या मुश्कीलीने क्षतिग्रस्त कारमधून बाहेर काढले. डायल 112 वरुन आलेल्या एम्ब्युलन्सद्वारे रामगडच्या आरोग्य केंद्रात जखमींना नेण्यात आले. तेथे तपासून त्यांना मृत घोषीत केले गेले. त्यानंतर मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले आहे. लग्नानंतर हे बलौदा येथे कारने परतत असताना हा भीषण अपघात झाला. ट्रक ड्रायव्हर अपघातानंतर गाडी तेथेच सोडून घटनास्थळावरून पळून गेला आहे.

शनिवारी लग्न लागलं होतं

या भीषण अपघाताच्या बातमीनंतर नवरा आणि नवरीच्या घरी सुरु असलेल्या आनंदी वातावरण ग्रहण लागले. लग्नघरात पार अवकळा पसरली. जेथे कालपर्यंत सनईचे सुर घुमत होते, नातेवाईकांच्या हसण्या खिदळल्याने वातावरण प्रफुल्लीत होते. तेथे सन्नाटा पसरला आहे. बलौदा रहिवासी असलेल्या शुभम सोनी आणि शिवरीनारायण येथे रहाणाऱ्या नेहा यांची शनिवारी विवाह झाला होता. गाडीत वधू आणि वरासह कुटुंबातील तीन सदस्य बसले होते.

कारचा झाला चक्काचूर

पकरीया जंगलात सकाळी 5 वाजताच्या दरम्यान चंडी देवी मंदिराजवळ समोरून वेगाने येणाऱ्या एका वेगवान ट्रकने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. धडक झाल्यानंतर इतका मोठा आवाज झाला की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. कारची अवस्था इतकी वाईट झाली होती की त्यातून जखमींना बाहेर काढताना खूप प्रयत्न करावा लागला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस आले. अपघातग्रस्त कारमधून जखमींना काढून त्यांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत करण्यात आले.

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.