Dombivali Bjp : डोंबिवलीत भाजपचं ऑफिस फोडलं, गुजराती सेलच्या कार्यालयावर हल्ला

Dombivali Bjp : मागच्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापलं होतं. निवडणूक अखेरच्या टप्प्यात आलेली असताना आता प्रचाराला धार आली आहे. नेत्यांकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Dombivali Bjp : डोंबिवलीत भाजपचं ऑफिस फोडलं, गुजराती सेलच्या कार्यालयावर हल्ला
Dombivali Bjp gujarati wing office vandalize
| Updated on: Nov 14, 2024 | 12:46 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. प्रचाराला आता धार आली असून नेत्यांकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापू लागलं आहे. काही मतदारसंघात धक्काबुक्की, हाणामारी झाल्याचा बातम्या येत आहेत. आता डोंबिवलीत भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याच वृत्त आहे.

डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील गृजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तीन ते चार अज्ञात व्यक्ती अचानक तिथे धडकले. त्यांनी शिवीगाळ केली. मारहाण करून तोडफोड केली. डोंबिवली विधानसभेत कॅबिनेट मंत्री भाजपा महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात थेट लढत आहे. तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या तोडीफोडीमागे कोण?

मागच्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापलं होतं. भाजपामधील सुत्रांनी या तोडफोडीच खापर विरोधकांवर फोडलं आहे. डोंबवलीत मागच्या तीन टर्मपासून रविंद्र चव्हाण आमदार आहेत. 2009 पासून ते सातत्याने डोंबिवलीमधून विधानसभेची निवडणूक जिंकत आहेत.