शिवसेनेनंतर आता शिंदे गटही मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला! कारण काय?

| Updated on: Sep 30, 2022 | 9:20 AM

यंदा मुंबईत दोन दसरा मेळावे होणार, एक शिवाजी पार्कवर तर दुसरा बीकेसीत! ठाकरेंच्या नेत्यांनंतर आता शिंदे गटातील नेतेही पोलीस आयुक्तांच्या भेटीला

शिवसेनेनंतर आता शिंदे गटही मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला! कारण काय?
महत्त्वाची बातमी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : शिवसेनेच्या नेत्यांनंतर (Shiv Sena Politics) आता शिंदे गटाचे (Eknath Shinde group) नेतेदेखील मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी आत शिंदे गटाचे नेते मुंबई पोलीस आयुक्तालात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर (Dussehra Melava) शिंदे गटाचे नेते आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतील. या भेटीसाठी खासदार राहुल शेवाळे, किरण पावसकर यांच्यासह इतरही काही शिंदे गटातील नेते जाणार आहेत.

दरम्यान, गुरुवारीच शिवसेना नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घ्यायचं ठरवलंय. या भेटीदरम्यान, नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

यंदा दोन दसरा मेळावे मुंबईत होणार आहेत. मुंबईत पहिल्यांच असं घडताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होईल. तर दुसरीकडे बीकेसीच्या एमएमआरडीए ग्राऊंड मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे गटाने शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रह धरला होता. राजकीय संघर्षाचा संभाव्य धोका पाहता, पालिकेनं शिंदे गटासह शिवेनेलाही दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली होती.

अखेर शिवसेनेनं हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली. शिवाय शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीही दिली.

मुंबई पालिकेनं पोलिसांच्या अहवालानुसार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, यासाठी दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली होती. मात्र आता शिवाजी पार्क सोबतच बीकेसीतही दसरा मेळावा होणार आहे.

5 सप्टेंबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना दोन्ही ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर समन्वय साधण्यासाठी शिवसेनेनं पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. आता शिंदे गटही पोलिसांच्या भेटीला जाणार असल्याचं समोर आलंय.