शनी देवा साडेसाती दूर कर, खडसे आणि फडणवीस एकाच दिवशी शनीशिंगणापूरला

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल (11 जानेवारी) शनिशिंगणापूर येथे शनीचे दर्शन (Eknath khadse devendra fadnavis visit shani shingnapur)  घेतलं.

शनी देवा साडेसाती दूर कर, खडसे आणि फडणवीस एकाच दिवशी शनीशिंगणापूरला
Follow us
| Updated on: Jan 12, 2020 | 9:45 AM

अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल (11 जानेवारी) शनिशिंगणापूर येथे शनीचे दर्शन (Eknath khadse devendra fadnavis visit shani shingnapur)  घेतलं. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल शनिशिंगणापूर येथे शनीचे दर्शन घेतले. फडणवीस आणि खडसे यांनी एकाच दिवशी शनीचे दर्शन घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल (11 जानेवारी) संध्याकाळच्या सुमारास शनिशिंगणापूर मंदिरात जाऊन शनीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शनीची पुजाही केली. इतंकच नव्हे तर शनी देवा साडेसाती दूर करं असे साकडंही फडणवीसांनी यावेळी घातलं.

तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी काल (11 जानेवारी) दुपारच्या सुमारास शनिशिंगणापूर येथे शनीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपल्या पत्नी आणि कुटुंबासह शनीचा अभिषेक केला. या दौऱ्याबाबत मात्र त्यांनी गुप्तता बाळगली होती. शनीचे दर्शन घेत साडेसाती दूर कर असे साकडंही शनी देवाच्या चरणी घातलं. यावेळी काही पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांवर टीकाही केली.

“मी भाजपवर नाराज नाही. माझी नाराजी ही पक्षातीलच फडणवीसांच्या टीमवर आहे. मला संपविण्याचा झालेला प्रयत्न पक्षाची प्रतिमा मलीन करणारा आहे. अशी टीका खडसेंनी यावेळी केली. मी योग्य वेळ आल्यावर माझ्या मनातील रोष व्यक्त करणार,” असेही एकनाथ खडसेंनी यावेळी (Eknath khadse devendra fadnavis visit shani shingnapur) सांगितले.

“भाजप सेना युतीला जनतेने कौल दिला. पण सरकार स्थापन करताना दोन्ही पक्षाकडून चुका झाल्यामुळे सरकार स्थापन करता आले नाही. या सरकारला जनादेश नसून हे सरकार फार काळ टिकणार नाही.” असेही खडसे यावेळी म्हणाले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून खडसे भाजपवर नाराज आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र एकाच दिवशी खडसे आणि फडणवीस शनी शिंगणापूरला गेल्याने तसेच साडेसातीची पुजा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले (Eknath khadse devendra fadnavis visit shani shingnapur) आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.