नाथाभाऊ आमचे जुने सहकारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाथाभाऊ आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. मी त्यांना भेटणार आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

नाथाभाऊ आमचे जुने सहकारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Dec 10, 2019 | 3:16 PM

मुंबई : लोकसभेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये स्पष्टता दिसत नाही. आम्ही बाजूने मतदान केलं. ते का केलं? सरकारच्या बाजूने केलं म्हणजे देशभक्ती नाही. घुसखोरांना बाहेर काढावे ही आमची भूमिका. जोपर्यंत त्यामध्ये स्पष्टता येत नाही, तोपर्यंत आम्ही पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.शिवसेनेने काय करावे हे कुणी सांगू नये. 370 कलम काढले त्याचे सर्वप्रथम अभिनंदन आम्ही केले, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray)

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा यासाठी दिला की जे अन्य देशातून कुणी आले, त्यांना आपले कुणी आहे असे वाटले पाहिजे. लोकसभेत जे प्रश्न उपस्थित केले त्यांची उत्तरे अजून मिळाली नाहीत. या विधेयकामध्ये अधिक स्पष्टता हवी. बाहेरुन जे अत्याचार होतात ते कुठे राज्यात राहणार याची स्पष्टता हवी, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

नाथाभाऊ आमचे जुने सहकारी : मुख्यमंत्री

नाथाभाऊ आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. मी त्यांना भेटणार आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीत जाऊन भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं होतं.

एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी खडसे यांना भेटीची वेळ देणार असल्याचं नमूद केलं आहे.

महिला सन्मान राखणं कर्तव्य

राज्यात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले महिलांचा सन्मान राखणं आपलं कर्तव्य आहे. पोलीस महासंचलकांची भेट घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.