उद्धव ठाकरेंसोबत 25 मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली; खडसे म्हणतात…

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली (Eknath Khadse meet CM Uddhav Thackeray ). या राजकीय भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरेंसोबत 25 मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली; खडसे म्हणतात...
Follow us
| Updated on: Dec 10, 2019 | 7:57 PM

मुंबई : भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली (Eknath Khadse meet CM Uddhav Thackeray ). या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे. (Eknath Khadse meet CM Uddhav Thackeray).

एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धातास भेट झाली. या भेटीबद्दल एकनाथ खडसेंनी पत्रकारांना माहिती दिली. एकनाथ खडसे म्हणाले, “शरद पवार यांच्याशी अर्धा तास चर्चा झाली. जळगावमधील काही विकास कामांसाठी शिफारस हवी आहे. त्यासाठी मी शरद पवार यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील या योजनांना साडेसहा हजार कोटी रुपये लागणार असल्याचं सांगितलं. तसंच त्यांनीही शिफारस केली तर या योजनांच्या कामाला वेग येईल.”

माझ्या मतदारसंघातील शेळगाव आणि बोदवड उपसा सिंचन योजनेला केंद्राने मंजूरी दिली आहे. त्यासाठी मला शिफारसीची ताबडतोब गरज होती. त्यासाठीच मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्याकडेही मी शरद पवारांप्रमाणेच शिफारशीची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे, असंही खडसेंनी नमूद केलं.

एकनाथ खडसे म्हणाले, “परवा (12 डिसेंबर) गोपीनाथ गडावर स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरवर्षी आम्ही या गडावर असतो. आताही आम्ही उपस्थित राहणार आहोत. मी मंत्री असताना 5 वर्षापूर्वी औरंगाबादला गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभं करावं यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. मात्र, अद्यापही ते काम झालेलं नाही. उद्धव ठाकरेंना मी हे स्मारक करण्याची विनंती केली आहे.”

उद्धव ठाकरे यांना गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाबाबतची घोषणा त्यांनी स्वतः करावी, अशीही विनंती केल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी प्राधान्याने गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करु देण्याचं आश्वासन दिलं. तसेच पुढील काळात उद्धव ठाकरे त्या भागातील दौऱ्यावेळी स्वतः स्मारकाच्या जागेला भेट देणार असल्याचंही खडसेंनी नमूद केलं.

“मी नाराज नाही, नाराजीच्या बातम्या चुकीच्या”

पक्षातील नेतृत्वाबद्दल वारंवार नाराजी व्यक्त करुन आणि दिल्लीतील नेत्यांना तक्रारी केल्याचं सांगूनही एकनाथ खडसे यांनी आपण नाराज नसल्याचा दावा केला. एकीकडे ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत. तसेच भाजपमधील नाराजांशीही चर्चा करत आहेत. मात्र, दुसरीकडे आपण नाराज नसून मी नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं मत खडसे व्यक्त करत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे अद्यापही आपले राजकीय पत्ते गुपितच ठेवण्याला पसंती देत असल्याची चर्चा आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, “मी नाराज नाही. मी नाराज आहे ही बातमी चुकीची आहे. माझी मनधरणी करण्यासाठी कुणी आलं यामध्येही तथ्य नाही. ते आले की राजकीय चर्चा होते. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक नेत्यांशी माझी ओळख आहे.”

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.