‘एकनाथ खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे’, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

| Updated on: Oct 11, 2020 | 3:14 PM

गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत?

एकनाथ खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान
Follow us on

जळगाव : भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात खडसेंच्या पक्षांतराचे संकेत देणारी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले. (Eknath Khadse will change his party is true said by Gulabrao Patil)

गुलाबराव पाटील हे आज दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना ते बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, मुंबईत खडसेंची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांसोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत 4 दिवस थांबून असताना खडसे आणि शरद पवार यांच्यात कोणत्याही प्रकारची भेट झाली नाही.

मध्यंतरी खडसेंनी शिवसेनेत यावे, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून घातला जात होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्यासह स्वतः गुलाबराव पाटील यांनी खडसेंना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, खडसेंनी याबाबत कोणतेही मत मांडले नव्हते. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे. (Eknath Khadse will change his party is true said by Gulabrao Patil)

मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज गुलाबराव पाटील यांनी दिलेली सूचक प्रतिक्रिया खडसेंच्या शिवसेना प्रवेशाकडे अंगुलीनिर्देश करत आहे.

इतर बातम्या –

Weather Alert: पुढच्या 3-4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून इशारा

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 5 आणि 10 रुपयांची नाणी विका, लखपती व्हा

(Eknath Khadse will change his party is true said by Gulabrao Patil)