Eknath Shinde : उद्या अग्निपरीक्षा! शिंदे गटाचं देवदर्शन; शुक्रवारी राज्यात नवं सरकार?

| Updated on: Jun 29, 2022 | 9:34 AM

Eknath Shinde : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आज सकाळीच कामाख्या मंदिरात जाऊ देवीचं दर्शन घेतलं. आरती करत सर्वांनी देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यानंतर शिंदे यांचा ताफा पुन्हा हॉटेलकडे निघाला आहे.

Eknath Shinde : उद्या अग्निपरीक्षा! शिंदे गटाचं देवदर्शन; शुक्रवारी राज्यात नवं सरकार?
उद्या अग्निपरीक्षा! शिंदे गटाचं देवदर्शन, एकनाथ शिंदे म्हणतात, आम्ही फ्लोअर टेस्टला हजर राहणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गुवाहाटी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना उद्या 30 जून रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी उद्या अग्निपरीक्षा ठरणार आहे. शिंदे गटाने (Eknath Shinde) बंड केल्यामुळे ठाकरे सरकारकडे बहुमत नाहीये. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. एकीकडे आघाडीसाठी उद्या सत्तेची अग्निपरीक्षा असणार असतानाच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक मात्र देवदर्शनात गुंतले आहेत. शिंदे समर्थकांनी आज कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावेळी शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही उद्या मुंबईत असू. फ्लोअर टेस्टला सामोरे जाऊ, असं शिंदे यांनी सांगितलं. मात्र, फ्लोअर टेस्टमध्ये शिंदे गट सहभागी होणार की तटस्थ राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे उद्याच्या घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आज सकाळीच कामाख्या मंदिरात जाऊ देवीचं दर्शन घेतलं. आरती करत सर्वांनी देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यानंतर शिंदे यांचा ताफा पुन्हा हॉटेलकडे निघाला आहे. हॉटेलमध्ये नाश्ता करून हे सर्व लोक मुंबईकडे यायला निघणार आहेत. हे सर्व आमदार थेट मुंबईत येणार नाही. मुंबईच्या आसपासच्या शहरात म्हणजे ठाण्यात वैगरे हे आमदार उतरण्याची चिन्हे आहेत. ठाण्यातील एखाद्या हॉटेलात हे आमदार राहण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

आम्ही फ्लोअर टेस्टला येणार

यावेळी एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही उद्या फ्लोअर टेस्टला सामोरे जाणार आहोत. मुंबईत येणार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. त्यांच्याकडे बहुमत आकडा नाहीये, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

1 जुलै रोजीच नवं सरकार?

दरम्यान, 30 जून रोजी फ्लोअर टेस्ट झाल्यानंतर 1 जुलै रोजीच नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यासाठीच्या हालचाली भाजपकडून सुरू केल्या असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यपालांकडून पत्रं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. उद्या 30 जून रोजीच बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.