Eknath Shinde : ठरलं! एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येणार, ‘बॅगा पॅक करुन तयार राहा’ बंडखोरांना शिंदेंच्या सूचना

| Updated on: Jun 29, 2022 | 10:35 AM

एकनाथ शिंदे यांनी गेल्या 9 दिवसांपासून बंड केलं होतं.

Eknath Shinde : ठरलं! एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येणार, बॅगा पॅक करुन तयार राहा बंडखोरांना शिंदेंच्या सूचना
एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

गुवाहाटी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी गुवाहाटीतील कामाक्षी देवीच्या मंदिरात प्रार्थना केली आणि त्यानंतर माध्यमांशी बाचतीत केली. आम्ही उद्या मुंबईत (Rebel MLA in Mumbai) पोहोचणार आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. बहुमत चाचणीसाठी आम्ही सर्व बंडखोर आमदार मुंबईत पोहोचणार आहोत, असं ते म्हणाले. इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही मुंबईत येऊ, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करा, असं म्हटलंय. त्यामुळे आता विशेष अधिवेशन हे बोलण्यात आलं असून उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदार चोख सुरक्षा व्यवस्थेत मुंबईत दाखल होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणतली ही सगळ्यात मोठी घडामोडी मानली जातेय.

बॅगा भरा, शिंदेंच्या सूचना

एकनाथ शिंदे यांनी गेल्या 9 दिवसांपासून बंड केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आजच बंडखोर आमदारांना आपल्या बॅगा भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ते गुवाहाटीतील कामाक्षी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बाचतीत केली. यावेळी त्यांनी आपण मुंबईत केव्हा येणार आहोत, हे स्पष्ट केलं. बंडखोर आमदार मुंबईत यायला आता निघणार आहेत.

थोडक्यात पण महत्त्वाचं

  1. उद्या मुंबईत पोहोचणार- एकनाथ शिंदे
  2. उद्या मुंबईत पोहोचून बहुमत चाचणीच्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाणार- एकनाथ शिंदे
  3. आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत, शिवसेनेच्या आमदाराच्या भूमिकेत अधिवेशनात पोहोचू
  4. उद्या महाराष्ट्रात विधानसभेत विशेष अधिवेशन बोलावलं, उद्याच बहुमत चाचणी पार पडणार
  5. बहुमत चाचणीनंतर बंडखोर आमदारांची बैठक होणार, त्यानंतर पुढील दिशा ठरवणार- शिंदे
  6. आमच्याकडे दोन तृतीआंशपेक्षा जास्त आमदार, आम्ही शिवसेनेचेच, शिंदेंचा पुनरुच्चार

महाविकास आघाडी सरकार कोसळणार?

एकनाथ शिंदे यांनी 39 शिवसेना आमदारांसह बंड केलंय. तर 9 अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत होते. आता हे सगळे आमदार मुंबईला येण्यासाठी निघणार असून ते नेमके मुक्कामाला कुठे थांबतात, हे पाहणं महत्त्वाचंय. मुंबईऐवजी गुजरातच्या सूरत किंवा गोव्यामध्ये हे बंडखोर आमदार थांबण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईत जीवाला धोका असल्याची भीती आधीच बंडखोर आमदारांनी व्यक्त केलेली होती. त्यामुळे आता हे आमदार मुंबईच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133

शिंदे गटाने बंडखोरीने केल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलेलं आहे. त्यामुळे नव्या सत्तेची समीकरणं नेमकी कशी असतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

वाचा महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींची लाईव्ह अपडेट्स : इथे क्लिक करा. Eknath Shinde News, Maharashtra Politics LIVE

 आमदाराचं नावमतदारसंघ
1एकनाथ शिंदेकोपरी-पाचपाखाडी
2भरत गोगावलेमहाड
3उदय सामंतरत्नागिरी
4संदीपान भुमरेपैठण
5गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण
6दादा भुसेमालेगाव बाह्य
7अब्दुल सत्तारसिल्लोड
8दीपक केसरकरसावंतवाडी
9शहाजी पाटीलसांगोला
10शंभुराज देसाईपाटण
11अनिल बाबरखानापूर
12तानाजी सावंतपरांडा
13चिमणराव पाटीलएरंडोल
14प्रकाश सुर्वेमागाठाणे
15विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिम
16संजय गायकवाडबुलडाणा
17प्रताप सरनाईकमाजीवडा
18महेंद्र दळवीअलिबाग
19महेंद्र थोरवे कर्जत
20प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य
21ज्ञानराज चौगुलेउमरगा
22श्रीनिवास वनगापालघर
23संजय रायमूलकरमेहेकर
24बालाजी कल्याणकरनांदेड उत्तर
25शांताराम मोरेभिवंडी ग्रामीण
26संजय शिरसाटऔरंगाबाद पश्चिम
27प्रकाश आबिटकरराधानगरी
28योगेश कदमदापोली
29सदा सरवणकरमाहिम
30मंगेश कुडाळकरकुर्ला
31यामिनी जाधव भायखळा
32लता सोनावणेचोपडा
33किशोरी पाटीलपाचोरा
34रमेश बोरनारे वैजापूर
35सुहास कांदे नांदगाव
36बालाजी किणीकरअंबरनाथ
37दिलीप लांडेचांदिवली
38आशिष जयस्वालरामटेक
39महेश शिंदेकोरेगाव