Eknath Shinde profile : एकनाथ शिंदे यांचा परिचय

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मानाचं पान असलेला शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde profile) होय.

Eknath Shinde profile : एकनाथ शिंदे यांचा परिचय
Follow us
| Updated on: Nov 28, 2019 | 6:56 PM

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मानाचं पान असलेला शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde profile) होय. कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde profile)  जमेच्या बाजू आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे. आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं योगदान मोठं आहे.

शिंदे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री (एमएसआरडीसी, सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. 1997 मध्ये एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. 2019 मध्ये शिवसेना विधीमंडळाचे गटनेते म्हणून शिंदेंची नियुक्ती झाली.

एकनाथ शिंदे यांची माहिती

  • मतदारसंघ : कोपरी-पाचपाखडी (ठाणे)
  • पक्ष – शिवसेना
  • वय – 55 वर्षे
  • शिक्षण – 10 वी उत्तीर्ण
  • संपत्ती – एकूण 14 कोटी
  • कुटुंब – पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.