एकनाथ शिंदे यांच्या नेतेपदाची शपथ कशाच्या आधारावर?; कपिल सिब्बल यांचा नेमका युक्तिवाद काय?

लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं. गुवाहाटीला का गेले. पक्षाच्या सभेला उपस्थिती लावायला हवी होती. शिवसेना पक्षात फूट म्हणता येणार नाही, असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्या नेतेपदाची शपथ कशाच्या आधारावर?; कपिल सिब्बल यांचा नेमका युक्तिवाद काय?
कपिल सिब्बल
| Edited By: | Updated on: Jan 20, 2023 | 4:54 PM

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या नेतेपदाची शपथ कशाच्या आधारावर?, असा सवाल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) मांडला. शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर असल्याचंही कपिल सिब्बल म्हणाले. कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेची माहिती पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला दिली. शिवसेनेची घटना ही कायदेशीर नाही हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट कोणत्या आधारावर म्हणत आहे? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगात सवाल केला. शिंदे यांच्या भाषणाची क्लिप ठाकरे यांच्या वकिलांकडे आहे.

नेतेपदाची शपथ कोणत्या आधारावर?

एकनाथ शिंदे यांनी नेतेपद घेतलं तेव्हा त्यांनी नेतेपदाची शपथ कोणत्या आधारावर घेतली होती? कपिल सिब्बल यांनी सवाल
केला. उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाची 23 जानेवारीला मुदत संपतेय. आम्हाला प्रतिनिधी सभा घ्यायला परवानगी द्या, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

प्रतिनिधी सभा घेऊ द्या

ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात दोन अर्ज दाखल करण्यात आले. आम्हाला प्रतिनिधी सभा घेऊ द्या आणि नेता निवडीसाठी ठाकरे गटाकडून अर्ज दाखल करण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीकडून पक्ष नेत्याची निवड होऊ शकते, असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केला.

राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या

एकनाथ शिंदे यांना पक्षाची घटनाच मान्य नाही. मग एकनाथ शिंदे यांची नेतेपदाची शपथ कोणत्या आधारावर? असा आक्षेपही कपिल सिब्बल यांनी घेतला. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगापुढं केली. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता असल्याचंही कपिल सिब्बल यांनी सांगितलं.

लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं. गुवाहाटीला का गेले. पक्षाच्या सभेला उपस्थिती लावायला हवी होती. शिवसेना पक्षात फूट म्हणता येणार नाही, असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.