“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डोळा कुठं?”, भास्कर जाधव यांनी केली अशी टीका

जी रक्कम फिक्स डिपॉझिट करून ठेवली आहे. त्यावरच भाजपच्या नेत्यांचा डोळा आहे. हे त्यांच्या कार्यक्रमातून आणि कालच्या भाषणातून जाणवत असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डोळा कुठं?, भास्कर जाधव यांनी केली अशी टीका
भास्कर जाधव Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 4:23 PM

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतल्या ३७ हजार ५०० कोटी रुपयांच्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी आले होते. भास्कर जाधव म्हणाले, मी पंतप्रधान मोदी यांचे भाषण पूर्णपणे ऐकलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलं. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा एकचं गाभा होता. मुंबई महापालिकेच्या अकाउंटमध्ये फिक्स डिपॉझिट केलेली रक्कम आहे. ९९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही फिक्स डिपॉझिट आहे. गेल्या २५ वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुंबई महापालिकेनं ही रक्कम ठेवली आहे. त्या रकमेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डोळा दिसतो, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

भाजपच्या ताब्यातील नागपूर महापालिका पूर्णपणे कंगाल झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका भाजपकडं गेल्या पाच वर्षांसाठी दिली. तिथं मोठ्या प्रमाणात लूट झाली. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी जवळजवळ ९०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. तो बाहेर आला.

मुंबईचा विकास करणं हा विषय बाजूला राहिला. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडून मुंबईला काय देणार, याबाबत अवाक्षरही काढलं नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.

उच्चपदस्थ व्यक्तीला हे शोभत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा डोळा हा मुंबई महापालिकेच्या ९९ हजार कोटी रुपयांवर आहे. जी रक्कम फिक्स डिपॉझिट करून ठेवली आहे. त्यावरच भाजपच्या नेत्यांचा डोळा आहे. हे त्यांच्या कार्यक्रमातून आणि कालच्या भाषणातून जाणवत असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली. पंतप्रधान हे देशाचे आहेत. अशा उच्चपदस्थ माणसानं अशी टीका करणं शोभत नाही.

मुंबईवर टीका करणे अयोग्य

उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याचा कारभार आला तेव्हा देशात कोरोनाचं संकट होतं. त्यावेळी कोणते निर्णय घ्यावे. काय करावं, काय करू नये. हे केंद्र सरकार येथे कळवत होतं. त्यामुळं त्यावेळी फक्त उद्धव ठाकरे हेच घराबाहेर पडले असे नाही. त्यामुळं पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तींन मुंबईवर टीका करणं योग्य आहे, असं मला वाटत नसल्याचंही भास्कर जाधव यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.