मंत्री अब्दुल सत्तार म्हणतात, पुढील निवडणूक ‘या’ चिन्हावर लढणार; आयोगाच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष

आमच्याकडे लोकशाही प्रमाणे मतं आहेत. मतांचा आलेख पाहिला तर धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाचं मिळेल, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

मंत्री अब्दुल सत्तार म्हणतात, पुढील निवडणूक 'या' चिन्हावर लढणार; आयोगाच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष
अब्दुल सत्तार
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 3:22 PM

हिंगोली : धनुष्यबाण कोणाची यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर या धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतीम निर्णय होईल. मात्र, धनुष्यबाण आमचाच असल्याचा दावा ठाकरे आणि शिंदे गटाकडून केला जात आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार आज हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे संतोष बांगर यांच्या कळमनुरी मतदार संघात आले. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवतात. हे कार्यकर्ते आतापासूनचं पेटून उठले आहेत. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या हिंगोली जिल्ह्यात मंत्री अब्दुल सत्तार आले असताना ते बोलत होते. आमचे आमदार आधीपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहेत, अशी सध्याची परिस्थिती आहे. यामध्ये तीळमात्र शंका नाही.

२०१९ च्या निवडणुकीत ज्या हिरोंचे फोटो लावले होते. त्यांच्याच सोबत आम्ही गेलो आहोत. आम्ही कोणताही चुकीचा काम केलेला नाही. आमच्याकडं १३ खासदार आणि ४० आमदार आहेत. या आमदार, खासदार यांना मिळालेली मतं ही अधिकृत आहेत. तिकडं म्हणजे ठाकरे गटाकडं १६ आमदार आणि ७ खासदार आहेत, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

धनुष्यबाण हा आमचाच असणार

या दोघांच्या मतांची बेरीज पाहिली तर धनुष्यबाण हा माझा आणि संतोष बांगर यांचा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यामध्ये कोणतीही शंका नाही, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

शेवटी कोर्टाचा निर्णय आहे

शेवटी कोर्ट आहे, ते काय निर्णय देते, यावर बोलणं उचित होणार नाही. परंतु, आमची अपेक्षा ही सत्याची आहे. आमच्याकडे लोकशाही प्रमाणे मतं आहेत. मतांचा आलेख पाहिला तर धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाचं मिळेल, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

कोर्टाच्या निर्णयाची वाट

यासाठी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. पुढील निवडणुका मी आणि संतोष बांगर हे शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर लढतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.