AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठा प्रश्न! शिवसेनेची 148 कोटी रुपयांची FD, 186 कोटींची मालमत्ता, शिंदेंची आगेकूच सुरूच, गल्ली ते दिल्ली धाकधुक वाढली!

शिवसेनेची मालमत्ता आणि कोट्यवधींच्या घरात असलेले फिक्स डिपॉझिट आता शिंदेंच्या शिवसेनेचे होणार, ही भीती दबक्या आवाजात व्यक्त केली जात आहे. 

सर्वात मोठा प्रश्न! शिवसेनेची 148 कोटी रुपयांची FD, 186 कोटींची मालमत्ता, शिंदेंची आगेकूच सुरूच, गल्ली ते दिल्ली धाकधुक वाढली!
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 20, 2023 | 1:10 PM
Share

नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission) शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताब्यात दिल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा आज शिंदे गटाने घेतला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आज इतर आमदारांसोबत या कार्यलायात प्रवेश केला. तसेच आता शिवालय हे कार्यालयही ताब्यात घेण्याची शिंदे गटाची तयारी सुरु आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय शिवसेना पक्षाशी संबंधित राज्यभरातील सर्व मालमत्ता तसेच पक्षाच्या निधीसाठी लागू होणार असल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कार्यकर्ते आणि नेत्यांची धाकधुक वाढली आहे. ही मालमत्ता आणि कोट्यवधींच्या घरात असलेले फिक्स डिपॉझिट आता शिंदेंच्या शिवसेनेचे होणार, ही भीती दबक्या आवाजात व्यक्त केली जात आहे.

शिंदे गटाची आगेकुच सुरूच..

  •  एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी आज विधीमंडळातील शिवसेनेचा ताबा घेतला. नियमानुसार जे जे शिवसेनेला मिळाले आहे, त्यावर आता अधिकृत मालकी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं.
  •  दुपारच्या वेळात शिंदे गटाचे आमदार मंत्रालय परिसरातील शिवालय हे शिवसेनेचं कार्यालयही ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.
  •  तर सर्वात मोठा प्रश्न आहे तो शिवसेना पक्षाशी संबंधित एफडी आणि स्थावर मालमत्तादेखील आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार, त्याचा. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मनात याच मुद्द्यावरून धाकधूक वाढली आहे.
  • शिवसेनेची अधिकृत वेबसाइटदेखील कालपासून बंद झाली आहे. ठाकरे गट आता नव्या नावाने वेबसाइट सुरु करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय.

कोट्यवधींची संपत्ती

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार हे नक्की आहे. शिवसेना पक्षाचा फंड वापरण्याचीही परवानगी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD आमि 186 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नाव आणि पक्ष चिन्ह सह मालमत्ता आणि डिपॉझिट रक्कम वापरण्यासही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

प्रॉपर्टीवर संजय शिरसाट काय म्हणाले?

विधीमंडळातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ आमची लढाई ही पक्षासाठी आहे. मालमत्ता बळकावण्यासाठी नाही. पक्षाचं चिन्ह नाव, महत्त्वाचं होतं. त्यासाठीची ही लढाई होती. त्या निर्णयानुसारच आम्ही पक्ष कार्यालयात जाऊन बैठक घेतली. शिवसेना भवनावर आम्ही अधिकार सांगणार नाहीत. आम्ही जेव्हा शिवसेना भवनावरून आम्ही जेव्हा जाणार, ते ताब्यात घेणार. शिवसेनेच्या राज्यभरातील शाखा शिंदे गट घेणार का… यावर शिरसाट म्हणाले, ज्या ट्रस्टच्या शाखा आहेत, त्या त्यांच्याच राहतील. ज्या शाखा शिंदे आमदारांनी उघडल्या आहेत, त्या शिंदे गटातील आमदारांच्याच राहणार आहेत.

ठाकरेंची अखेरची झुंज

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला जबरदस्त धक्का दिला असला तरी ठाकरे गटाने आता शेवटची आरपारची लढाई सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयालाच सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. तसेच सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल स्थगित करावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. उद्या मंगळवारी सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावरील सुनावणीस सुरुवात होणार आहे. यावेळी ठाकरे गटाने आज दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल