पूजा भट्ट आता काँग्रेसमध्ये? भारत जोडो यात्रेतल्या एंट्रीवरून चर्चा!

आज या पदयात्रेत पूजा भट यादेखील राहुल गांधींसोबत वेगाने चालत होत्या. त्यांना पाहून यात्रेतील सदस्यांना खूप आनंद झाला.

पूजा भट्ट आता काँग्रेसमध्ये? भारत जोडो यात्रेतल्या एंट्रीवरून चर्चा!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2022 | 1:45 PM

हैदराबादः काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेत एके काळची लोकप्रिय अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट (Pooja Bhatt) सहभागी झाली. राहुल गांधींच्या पदयात्रेत या बॉलिवूड अभिनेत्रीने अचानक एंट्री घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पूजा भट्ट यांचे भारत जोडो यात्रेतील फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणारी पूजा भट्ट ही पहिली अभिनेत्री आहे. बुधवारी काळ्या रंगाचा फुल स्लीव्हचा कुर्ता, पांढरा पायजामा आणि प्रिंटेड स्टोल अशा पेहरावात पूजा भटट् या यात्रेत सहभागी झाली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आजचा ५६ वा दिवस आहे. ७ सप्टेंबर रोजी तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून यात्रेला प्रारंभ झाला.

आज या पदयात्रेत पूजा भट यादेखील राहुल गांधींसोबत वेगाने चालत होत्या. त्यांना पाहून यात्रेतील सदस्यांना खूप आनंद झाला.

पूजा भट्ट त्यांच्या ट्विटर हँडल तसेच इतर सोशल मिडियावर वेळोवेळी व्यक्त होत असते. मात्र तिने अद्याप कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही.

येत्या 7 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक नेते राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होतील. यावेळी काँग्रेस संबंधी इतर बॉलिवूड अभिनेतेही यात्रेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.