महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पहिला निकाल जाहीर

| Updated on: Oct 24, 2019 | 11:22 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल आला आहे. हा निकाल नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून लागला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पहिला निकाल जाहीर
Follow us on

नंदुरबार : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल (First result of Maharashtra Assembly Election 2019) स्पष्ट झाला आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात (Nandurbar Assembly Election Result) एकूण 1 लाख 87 हजार 373 मतदान झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघात विजयी होण्यासाठी 93,686 मतांची आवश्यकता आहे. भाजपचे उमेदवार विजयकुमार कृष्णराव गावित (Vijaykumar Gavit win from Nandurbar) यांना 94 हजार 442 मतं मिळाली आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार उदयसिंग कोचरु पांडवी यांना 35 हजार 39 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विजयकुमार गावित हे विजयी झाले असून आता निवडणूक आयोगाकडून केवळ औपचारिकता म्हणून घोषणा करणं बाकी आहे.

शहाद्याचे भाजप आमदार उदेसिंह पाडवी यांच्याऐवजी पुत्र राजेश पाडवी यांना तिकीट मिळालं होतं. त्यामुळे नाराज उदेसिंह पाडवी यांनी पक्षांतर करत काँग्रेसचा झेंडा हाती धरला. त्यानंतर पाडवींना मतदारसंघही बदलून मिळाला. त्यामुळे शहादाऐवजी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना मतदारांनी कौल दिलेला नाही.

जिल्ह्यातील सर्व 4 विधानसभा मतदारसंघ (Nandurbar assembly seats) राखीव आहेत. 2014 मध्ये सत्ताधारी भाजपला 2 आणि काँग्रेसला 2 जागा (Nandurbar assembly seats) मिळाल्या. गेल्या निवडणुकीत भाजपने या जिल्ह्यात मोठं यश मिळवत दोन जागांवर विजय मिळवला होता. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी विजय मिळवला होता.

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या मूळ गावी नकावर येथे मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाला जाण्यापूर्वी त्यांनी आईचा आशीर्वाद घेऊन मतदान केलं होतं. या निकालातून त्यांना आईच्या आशिर्वादासोबतच जनतेचाही आशिर्वाद मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
अक्कलकुवाआमशा पडवी (शिवसेना)अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस)अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस)
शहादाराजेश पडवी (भाजप)पद्माकर वळवी (काँग्रेस)राजेश पाडवी (भाजप)
नंदुरबारविजयकुमार गावित (भाजप)उदेसिंह पाडवी (काँग्रेस)विजयकुमार गावित (भाजप)
नवापूरभरत गावित (भाजप)शिरीष नाईक (काँग्रेस)शिरीष नाईक (काँग्रेस)

2014 चा निकाल – नंदुरबार : एकूण जागा 04 (Nandurbar MLA list)

1 – अक्कलकुवा – के सी पाडवी (काँग्रेस)

2 – शहादा – उदयसिंह पाडवी (भाजप)

3 – नंदुरबार – विजयकुमार गावित (भाजप)

4 – नवापूर – सुरूपसिंग नाईक (काँग्रेस)