Narendra Modi Speech: विकसीत भारताचं ध्येय गााठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगतलेले 5 संकल्प नेमके कोणते?

Azadi Ka amrut Mahotshav : वैविध्यपूर्ण संस्कृती असलेल्या भारता एकता आणि एकजुटीचा चौथा संकल्प फार महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे, असंही ते म्हणाले.

Narendra Modi Speech: विकसीत भारताचं ध्येय गााठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगतलेले 5 संकल्प नेमके कोणते?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 15, 2022 | 8:47 AM

नवी दिल्ली : लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi News) यांनी स्वातंत्र्यदिनाचं भाषण करताना भारताचं पुढील 25 वर्षांचं ध्येय (Indian Developed Country) काय असलं पाहिजे, यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पंचसंकल्पांचा उल्लेख केले. पाच संकल्पांचा जर अवलंब केला, तर भारताला विकसीत देश होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही, असंही मोदी यांनी म्हटलंय. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं सलग नववं भाषण केलं. भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन (Azadi Ka Amrit Mahotsav) आज साजरा केला जातोय. या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना मोदींनी भारताला विकसीत देश करण्याचं आपलं लक्ष्य असलं पाहिजे, असं म्हटलं. शिवाय हे लक्ष्य गाठण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याचा संदेशही देशवासीयांना दिला.

नरेंद्र मोदींनी सांगितलेले 5 संकल्प

  1. विकसीत भारत पहिला संकल्प
  2. गुलामीचा अंश मिटवणं दुसरा संकल्प
  3. आपल्या वाराश्यावर गर्व हवा
  4. एकता आणि एकजुटीला चौथा संकल्प
  5. नागरिकांचं कर्तव्य पाचवा संकल्प

देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष झाली आहेत. यापुढच्या 25 वर्षात देशाला विकसीत देश म्हणून ओळख आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी इतर देशांनी आपल्याला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असा टोलाही मोदींनी लगावला. विकसीत भारत हाच आपला पहिला संकल्प असला पाहिजे. त्यासाठी सर्वच क्षेत्रात आपल्याला काम करावं लागणार आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे स्वदेशाची नारा देतही मोदींनी आपल्या देशातील वारशावरही प्रत्येकानं गर्व करायला हवा, असंही म्हटलंय.

पाहा व्हिडीओ :

वैविध्यपूर्ण संस्कृती असलेल्या भारता एकता आणि एकजुटीचा चौथा संकल्प फार महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे, असंही ते म्हणाले. आत्मनिर्भर भारताचं ध्येय पूर्ण केल्यास भारताला विकसीत करण्याच्या मार्गात कोणताच अडथळा येणार नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान, त्यासाठी नागरिकांचं कर्तव्य हा पाचवा संकल्प असल्याचं मोदींनी म्हटलं.