Laxman Sivaramakrishnan | 17 व्या वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण, आता भाजपमध्ये प्रवेश

| Updated on: Dec 30, 2020 | 2:54 PM

लक्ष्मण शिवरामकृष्ण यांनी 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

Laxman Sivaramakrishnan | 17 व्या वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण, आता भाजपमध्ये प्रवेश
माजी क्रिकेपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा भाजपप्रवेश
Follow us on

तामिळनाडू : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांनी राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. त्यांनी आज (30 डिसेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष सी टी रवी (Chikkamagaravalli Thimme Gowda Ravi) उपस्थित होते. (Former Indian cricketer Laxman Sivaramakrishnan has joins BJP in Chennai)

शिवरामकृष्णन यांच्या भाजप प्रवेशावर सी टी रवी आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश न करण्याच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली. “रजनीकांत हे एक दिग्गज नेते आहेत. आम्ही सर्व त्यांचा आदर करतो. रजनीकांत हे नेहमी तामिळनाडू आणि देशाच्या हिताची गोष्ट करतात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

रजनीकांत यांना नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजकीय पक्षाच्या स्थापनेबाबत आणि राजकारणातील प्रवेशाबाबत नकार दिला. रजनीकांत यांना काहील दिवसांपूर्वी उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राजकारणात प्रवेश करणारे क्रिकेटर

क्रिकेट आणि राजकारणाचा गेल्या काही दशकांपासूनचा संबंध राहिला आहे. आतापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, नवज्योत सिंह सिद्धू, किर्ती आझाद, विनोद कांबळी यासारख्या क्रिकेटपटुंचा समावेश आहे.

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची कारकिर्द

लक्ष्मण शिवरामकृष्ण यांनी टीम इंडियाचं 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये  प्रतिनिधित्व केलं. त्यांनी कसोटींमध्ये 26 तर वनडेमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश, ‘राजकीय’ बॅटिंगला सुरूवात

(Former Indian cricketer Laxman Sivaramakrishnan has joins BJP in Chennai)