AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपची डोकेदुखी वाढली, बंडखोरी करत माजी खासदाराचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर : भाजपची अहमदनगरमध्ये डोकेदुखी वाढली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार आणि भाजपचे बंडखोर नेते भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिर्डीमधून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर नाराज झालेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. शिवसेना आणि भाजप युतीमध्ये शिर्डी हा राखीव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. […]

भाजपची डोकेदुखी वाढली, बंडखोरी करत माजी खासदाराचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
BJP
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

अहमदनगर : भाजपची अहमदनगरमध्ये डोकेदुखी वाढली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार आणि भाजपचे बंडखोर नेते भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिर्डीमधून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर नाराज झालेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.

शिवसेना आणि भाजप युतीमध्ये शिर्डी हा राखीव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे. वाकचौरे यांनी लोखंडेंवर विकास कामावरून टीका केली. निवडून आल्यानंतर साडेचार वर्षे मतदारसंघात कुठलाही विकास केला नसल्याचा आरोप करत जनतेच्या हितासाठी आपण अपक्ष उमेदवारी करत असल्याचं भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्पष्ट केलं.

अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर आघाडी आणि युतीला संघर्ष करावा लागतोय. अगोदर भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापून नुकतेच भाजपात आलेले सुजय विखे यांना तिकीट दिलं. तर सुजय विखेंचं वडील काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील नाराज असल्यामुळे आघाडीचीही डोकेदुखी आहे. त्यातच भाजपमधून बंडखोरी झाल्याने आता युतीचीही डोकेदुखी वाढणार आहे.

महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात शिर्डी मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल