AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोयना धरणातील पाण्याच्या मुद्द्यावर मंत्री गिरीश महाजन यांना मोठा खुलासा, थेट रोहित पाटील यांच्यावर..

गिरीश महाजन यांनी नुकताच मोठे विधानकेले कोयनेच्या पाण्यावर त्यांनी भाष्य केले. कोयनेचे पाणी मुंबईला दिले जात असल्याचे आरोप करणाऱ्या रोहित पाटलांनी सर्वात अगोदर अभ्यास करणे आवश्यक आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

कोयना धरणातील पाण्याच्या मुद्द्यावर मंत्री गिरीश महाजन यांना मोठा खुलासा, थेट रोहित पाटील यांच्यावर..
Girish Mahajan
| Updated on: Nov 25, 2026 | 1:50 PM
Share

गिरीश महाजन यांनी नुकताच मोठे विधान केले. गिरीश महाजन यांनी म्हटले की, 2014 ते 19 दरम्यान कोकणातील प्रकल्प चौकशी लागली. त्यावेळी मुंबईला पाणी पुरवण्यासाठी कोयनेचा विचार झाला. तिथे जलविद्युत प्रकल्प आहे याठिकाणी वीज निर्मितीनंतर पाणी समुद्रात जाते. मधे त्याचा काहीही उपयोग नाही. लोटे इंडस्ट्रीला पाव टीएमसी पाणी जाते. म्हणून हे पाणी मुंबईला आणायचा विचार झाला. मधे ज्या एमआयडीसी लागतात, त्यांना ही पाणी देण्याचा विचार झाला. उरलेले पाणी मुंबईला आणायचे ठरले. ही मागची योजना होती. तिला चालना द्यायचे ठरले. आपण सांगली सातारा किंवा कोयना धरणातील पाणी घेत नाही. जे पाणी वीज निर्मितीनंतर समुद्रात जाते ते घेऊन जात आहोत, थोडासा अभ्यास केला पाहिजे. परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे, कुणाचे ही पाणी याठिकाणी घेतले जात नाही.

विरोधकांबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, कुणाच्या मनात शंका असेल तर बैठक घेऊ. आम्ही सर्व परिस्थिती समोर ठेवू. हा जुना विषय आहे. रोहित पाटील यांच्याबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, आपण थोडा तरी अभ्यास केला पाहिजे. सातारा किंवा सांगलीचे हे पाणी नाही. वीज निर्मितीनंतर वशिष्ठी नदीतून समुद्रात जाते. तेच पाणी आपण घेऊन जात आहोत.

जळगावातील कुटुंबाला सुरतमध्ये कालव्यात ढकलून दिल्याच्या घटनेवर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, मला आताच कळाले. गंभीर घटना आहे. कामाला गेल्याचे कळाले. नेमके काय झाले याची माहिती घेतोय. बेपत्ता झाल्याचे कळाले. एक मुलगा वाचला त्याने पोलिसांना माहिती दिली. मी एसपींसोबत संपर्क करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय टाकतोय.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, आम्ही महायुती म्हणून लढत आहोत. 12 ठिकाणी बिनविरोध आम्ही जिंकलो आहोत. 9 ठिकाणी लढत असून विरोधकांचे डिपॉजिट जप्त करू. महाविकास आघाडीचे उमेदवारच नाहीत. तुमचे पँनल नाही, मग मागणी व शंखनाद कशाला करत आहात.

Follow Us
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...
राऊतांच्या आरोपांना शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊतांच्या आरोपांना संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला...
Amravati : 2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला कायदेशीर नोटीस
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर मुबई हायकोर्ट मध्ये सुनावणी...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर मुबई हायकोर्ट मध्ये सुनावणी
नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, दिपके नागपूरला रवाना
CJP Protest : नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, अभिजित दिपके नागपूरला रवाना
राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा...
Raj thackeray : राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा; निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राऊतांचा शिंदे...
Sanjay Raut : लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली, चर्चांना उधाण