Girish mahajan : गिरीश महाजनांनी का घेतली अमित शाह यांची भेट? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा?

आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सहाजिकच अमित शाह गिरीश महाजन यांच्या भेटीत शिजलं काय? अस सवाल, राज्याच्या राजकारणात उपस्थित झाला आहे.

Girish mahajan : गिरीश महाजनांनी का घेतली अमित शाह यांची भेट? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा?
गिरीश महाजनांनी का घेतली अमित शाह यांची भेट? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा?
Image Credit source: twitter
| Updated on: Jul 28, 2022 | 11:07 PM

नवी दिल्ली : गेल्या एक महिन्यात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलं आहे. राज्यातलं ठाकरे सरकार कोसळलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र एक महिना उलट त्याला तरी या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना रोज धारेवर धरत आहेत. हम तुम एक कमरे में बंद हो, असे या दोघांचा सरकार आहे. एक दुजे के लिए, असे म्हणात या सरकारवर टीका होत आहे. अशातच आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सहाजिकच अमित शाह गिरीश महाजन यांच्या भेटीत शिजलं काय? अस सवाल, राज्याच्या राजकारणात उपस्थित झाला आहे.

गिरीश महाजन यांचं ट्विट

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा

गिरीश महाजन आणि अमित शहा यांच्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात गिरीश महाजन यांना मोठं खातं मिळण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन भाजपमधील आघाडीवरील नेते आहेत. उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. गिरीश महाजन यांची देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातली कामगिरी ही लक्षणीय राहिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जी आंदोलन उभा राहिली, त्या प्रत्येक आंदोलनाला सामोरे जायला गिरीश महाजन हजर असायचे. अनेक मोर्चे गिरीश महाजन यांनी शांत केली आहेत. त्यामुळे महत्वाच्या खात्यावर त्यांची वर्णी लागणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील निवडणुकीतही महत्वाचा रोल

तसेच गिरीश महाजन यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये ही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक असो, जळगाव महानगरपालिकेची निवडणूक असो, किंवा धुळे महानगरपालिकेची निवडणूक असो, या सर्व निवडणुकांमध्ये गिरीश महाजन यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्याकडे भाजपसाठी भविष्यातील मोठं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. त्यातच आजही भेट ही राज्याच्या राजकारणात चर्चेत चांगलीच राहणारी आहे.