Girish Mahajan : खडसेंबाबत आता बोलण्यासारखं…गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंच्या जिव्हारी लागणारा वार

Girish Mahajan : गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते. काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकाच पक्षात होते. मात्र,आता दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे परस्परांचे कट्टर विरोधक मानले जातात.

Girish Mahajan : खडसेंबाबत आता बोलण्यासारखं...गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंच्या जिव्हारी लागणारा वार
Girish Mahajan-Eknath Khadse
| Updated on: Nov 18, 2025 | 10:13 AM

नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते. काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकाच पक्षात होते. मात्र,आता दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे परस्परांचे कट्टर विरोधक मानले जातात. आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर बोचरी टीका केली. ‘कोण ओळखतो त्या खडसेला?’ असं गिरीश महाजन म्हणाले. मुक्ताईनगर ताकद कमी झाल्याचं एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलं होतं. “बरोबर आहे खडसेंचं. काय चुकीचं त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते खडसे आहेत आणि ते असं म्हणतात तर त्यांचं बरोबर आहे” असं गिरीश महाजन म्हणाले.

“खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे कळत नाहीत. खडसेंबाबत आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. मुक्ताईनगरमध्ये आमचे मित्र पक्ष चंद्रकांत पाटील हे वेगळं लढतायत. एकनाथ खडसे लोकसभेला म्हणतात सुनेला मदत केली. प्रत्येक निवडणुकीला खडसे हे आपली भूमिका बदलत असतात. एकमेकाला शिव्या द्यायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचं” अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना काय आव्हान दिलं?

“आता खडसेचं काही राहिलेलं नाही. जिल्ह्यात निकाल लागल्यावर कोणाची किती ताकत आहे, उबाठाची किती ताकद आहे? काँग्रेसची किती ताकद आहे? आणि शरद पवार पक्षाची किती ताकद आहे हे कळेल. खडसेंनी जिल्ह्यातील एखादी तरी नगरपालिका निवडून आणून दाखवावी” असं गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं.